गुलामीचे प्रतीक असलेली ब्रिटिश धार्जिनी मुद्रा भारतीय सैनिक या पुढे वागवणार नाहीत – प्रवीण गायकवाड

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

मुदखेड ता.प्रतिनीधी

मुदखेड – मुदखेड पत्रकार परिषद येथील शासकीय विश्राम गृहात भारतीय जनता पार्टी च्या वतीने पत्रकार परिषद घेऊन, आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी राजे यांच्या अरमार विषयक धोरणावर प्रकाश टाकून गत वर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या सरकारने नौसेनेच्या झेंड्यावर शिवाजी राज्यांची मुद्रा लावली होती, या वर्षी म्हणजे काल शिंधुदुर्ग किल्यावर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले, राजांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. नौ सैनिकांच्या गणवेशावर आता शिवाजी महाराजांची मुद्रा असणार आहे. गुलामीचे प्रतीक असलेली इंग्रज कालीन मुद्रा आता भारतीय सैनिक वागवणार नाहीत, गेली 70 वर्ष स्वतंत्र भारताची नौसेना, गुलामीचे प्रतीक असलेल्या ध्वजाला वंदन करत होती. मोदी सरकारने हे गुलामगिरीचे प्रतीक नष्ट करून देशवासीयांना आणि नौसेनेलाही अभिमान वाटेल असा हा बदल करून दाखवला आहे. आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव करणारे मोदी सरकार हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिले सरकार आहे. आधुनिक भारताची नौसेना या कोकणाच्या भूमीत या महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण झाली असे म्हणून मोदीजींनी या भूमीलाही वंदन केले. काल झालेल्या नौसेनेच्या प्रतीक्षकांमध्ये एका युद्धनौकेचे नेतृत्व एका महिलेच्या हातात होते. मोदी सरकारने महिला सक्षमीकरणासाठी जितक्या गोष्टी केल्या आहेत तितक्या गेल्या 70 वर्षात कोणी केल्या नसतील. मोदीजींनी त्यांच्या भाषणातून सांगितले की नौसेनेमध्ये सुद्धा नारीशक्तीला प्रोत्साहन देणे ही आमची प्राथमिकता आहे. गेल्या 70 वर्षात प्रथमच एक पंतप्रधान आपल्या नौसेनेचा दिवस साजरा करण्यासाठी सिंधुदुर्ग वर आले होते. स्वतंत्र भारताच्या इतिहासात गेली 70 वर्ष आपल्या सशस्त्र सेनांचे दिवस दिल्लीतील एखाद्या लॉनवर साजरे होत असत. म्हणून भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर जिल्हा व मुदखेड तालुक्याच्या वतीने मोदी सरकारचे आभार मानण्यात आले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्राच्या भूमीत येऊन कृतीतून करून दाखविला मुद्रेचा नौसेनेच्या पोशाखात समावेश करून छत्रपती शिवाजी महाराज हे आधुनिक भारताच्या नऊ सेनेचे जनक होते शेवटच्या माणसापर्यंत विचार रुजावा याकरता ही आजची पत्रकार परिषद घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.छत्रपती शिवाजीराजे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पत्रकार परिषदेश सुरवात करण्यात आली. या पत्रकार परिषदेस भाजपा उत्तर जिल्ह्याचे महामंत्री प्रवीण गायकवाड जिल्हा सचिव भगवान पानेवार, भाजपा शहराध्यक्ष संजय सोनटक्के, गजानन कमळे, निळकंठ हमंद, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन माने, सुरेश शेटे बालाजी तेलंग,हमीद भाई भंगारवाले, प्रभाकर पांचाळ, शिवाजी बाचेवाड,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!