मनोज जरांगे यांच्या नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी सभा

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड प्रतिनिधी/

नांदेड : मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेतलेले आंदोलन राज्यभरात अधिक जोमाने चालू असताना (ता.8) डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात एकूण चार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिजाऊ नगर येथील सभेपासून आपल्या दिवसाची सुरुवात करत अनुक्रमे मारतळा, नायगाव आणि कंधार येथील सभेला संबोधित करणार आहेत. अशी माहिती सकल मराठा समाज, नांदेडच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. नांदेड जिजाऊनगर वाडिपाटी येथे मातोश्री कॉलेजच्या पाठीमागील कल्हाळ येथिल तब्बल १११ एकरचे मैदान निवडले असून सदरील मैदानावर नांदेड शहरासह ग्रामीण भागातील लाखो समाज बांधव या सभेला येणार असल्याचे नियोजन समितीकडून सांगण्यात आले.

विवध समिती करणार नियोजनया सभेचे नियोजन सुद्धा अतिशय शिस्तबद्ध चालु असून जवळपास १९ समित्या नेमण्यात आल्या आहेत. वैद्यकीय समिती, अन्न वाटप समिती, पाणी वाटप समिती, पार्किंग व्यवस्थापन समिती, स्टेज व्यवस्थापन समिती, मराठा सेवक समिती, प्रचार-प्रसार माध्यम समिती, कायदेशीर कागदपत्रे पुरवठा समिती यासह विविध समित्या बनवून आप आपल्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत.

Share This Article
error: Content is protected !!