स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ;भाजपाच्या वतीने काँग्रेस मंत्री प्रियांक खरगे यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी
माहूर – आजकालच्या डिजिटल युगात चित्रपटातील नायकाच्या व्यक्तीरेखेचे आणि राजकारणातील नेत्यांच्या भुमिकेचे त्यांच्या सार्वजनिक बोलण्या वागण्याचे समाजमनावर लगेच बरेवाईट परिणाम होताना दिसून येतात.या गोष्टीची जाणीव असूनही सध्या राजकारणातील नेते मंडळी आपली भारतीय संस्कृती विसरून महापुरुषांबद्दल विनाकारण अनापशनाप टीकाटिप्पणी करून सतत लाईमलाईट मध्ये राहण्यासाठी अकलेचे तारे तोडताना दिसतात.
असाच काहिसा आरोप करत माहूर तालुका भाजपाच्या वतीने काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र कर्नाटक सरकार मधील मंत्री प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्याबद्दल अपमान कारक शब्द वापरून या देशाचे महापुरुष वीर सावरकर यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज शुक्रवार दि.०८ नोव्हेंबर रोजी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मंत्री प्रियांक खरगे यांच्या फोटो प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष कांतराव घोडेकर
तथा शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या जोडे मारो आंदोलनात
युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप राठोड,मिशन मोदी अगेन पीम अभियान प्रदेश अध्यक्ष श्याम भारती महाराज,महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्या पद्मा गिऱ्हे, ता.सरचिटणीस अपील बेलखोडे,
युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विनायक मुसळे,जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय आमले,नंदकुमार जोशी,अनिल वाघमारे,नगरसेवक गोपू महामुने,
राजू दराडे,राजू मुडाणकर,संजय बनसोडे,निलेश जैस्वाल,अर्जुन मोहिते,राहूल चव्हान यांच्यासह
भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!