भोरड येथे “आपला संकल्प’ विकसित भारत” यात्रा कार्यक्रमाचे आयोजन

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी
माहूर :-पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध जनकल्याकारी योजनांची माहिती ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचावी व तळागाळातील गोरगरिबांना या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या “आपला संकल्प,विकसित भारत”यात्रेचे आयोजन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी सुरेश कांबळे तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.माचेवार यांच्या संयोजनातून माहूर तालुक्यातील भोरड (पालाईगुडा) येथे सरपंच जनार्दन हुसेन धुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली तर आमदार भीमराव केराम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.०९ नोव्हेंबर रोजी तालुका प्रशासकीय विभाग प्रमुख तथा ग्रामस्थांच्या सहभागातून यशस्वी रीत्या करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, सुधाकर भोयर,जिल्हा अध्यक्ष भा.ज.पा,श्याम भारती महाराज
मिशन मोदी अगेन पीएम प्रदेश अध्यक्ष,धरमसींग राठोड,
भा.ज.पा.नेते,कांतराव घोडेकर तालुका अध्यक्ष, गोपू महामुने नगरसेवक,निळकंठ कातले स्विय सहाय्यक आमदार,शरद राठोड माजी सभापती,संतोष चनमनवार शहर अध्यक्ष किनवट, प्रवीण सिरमनवार लोकसभा विस्तारक,अनिल वाघमारे, देवरावजी कुडमेते,किसन राठोड सदस्य आरोग्य कल्याण समिती, बाबूखान पठाण ग्रा.पं सदस्य वाई बाजार,डॉ.प्रेम मोरे मानसेवी वै.अधिकारी,डॉ.सचिन पाटील समुदाय आ.अधिकारी, सयाजीराव जोगपेटे ता.आ.सहाय्यक,डॉ.बिराजदार पशुवैद्यकीय अधिकारी,अनुप राठोड उपसरपंच,तथा सदस्यगण राजु राठोड,दसरथ राठोड,चंदन पवार,उल्लास आडे,रघुनाथ धुर्वे, संजय पवार,संतोष आडे,उत्तम धुर्वे,अमोल राठोड,अविष्कार राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

“आपला संकल्प, विकसित भारत” या यात्रेच्या निमित्ताने माहूर तालुक्यातील प्रशासकीय विभाग प्रमुखांच्या वतीने या यात्रे दरम्यान आतापर्यंत लाभ मिळाला नाही अशा योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवणे,माहितीचा प्रसार व योजने बद्दल माहिती देऊन नागरिकांशी संवाद अनुभव तसेच या लाभार्थ्यांची नोंदणी करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे..
यावेळी बोलताना आमदार भीमराव केराम म्हणाले कि,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचे वार्षिक सहा हजार रुपये,गोरगरिबांना आरोग्य सेवेसाठी पाच लाखाचा आरोग्य कवच या व इतर विविध लोककल्याणकारी योजना ह्या केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहेत.त्या सर्व योजना तळागाळातील नागरिकांना मिळाल्या पाहिजेत हा प्रमुख उद्देश या “आपला संकल्प, विकसित भारत” यात्रा कार्यक्रमाचा आहे.


यावेळी शिवचरण जाधव, आरोग्य विस्तार अधिकारी तथा नोडल अधिकारी माहूर,श्याम भारती महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रमेश गावंडे आरोग्य विस्तार अधिकारी पं.स.माहूर यांनी तर सूत्रसंचालन कुडे सरसर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक आळणे मॅडम ग्रामसेविका,ग्रा.पं.भोरड यांनी आभार मानले.यावेळी गाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!