हिमायतनगर तालुका प्रतिनिधी/जरगेवाड बाबाराव
हिमायतनगर /नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय श्री.अमित साहेब ठाकरे नांदेड येथे यांच्या प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना हिमायतनगर शहर अध्यक्ष पदी विठ्ठल खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली. व खंदारे म्हणाले की येणाऱ्या काळात विद्यार्थी संघटनेचे माध्यमातून भरपूर वेळ देण्यासाठी कमी पडणार नाही असे सांगितले आहे. विठ्ठल खंदारे यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये अनेक विद्यार्थी लवकरच प्रवेश करणार आहेत अशी माहिती दिली आहे.