मुदखेड तालुक्यातील सरेगाव येथील दोन मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

मुदखेड प्रतिनिधी/ राहुल कोलते

मुदखेड – मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जात आहे. मुदखेड तालुक्यातील सरेगाव येथील जीवनराव गंगाधरराव कळणे व बालाजी महाजन गिरे यांना उपविभागीय अधिकारी भोकर सचिन यादव यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मुदखेड येथील सन १९१८ च्या गाव नमुना ३३ मधील मोडी लिपीत अभिलेखा मध्ये सरेगाव येथील ११ कुणबी नोंदी आढळल्या. त्यांची वंशावळ सादर करून दोन कुणबी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले. यावेळी मुदखेड चे तहसीलदार मुगाजी काकडे, मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, नायब तहसीलदार मारुती जगताप, विजयकुमार पाटे, संतोष कामटेकर व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!