गडचिरोली प्रतिनिधी/
गडचिरोली – मौजा खेडमक्ता ता. ब्रह्मपुरी जि. गडचिरोली येथे नवयुवक नाट्य कला मंडळ खेडमक्ता च्यावतीने आयोजित “भाग्यलक्ष्मी” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी त्यांच्या उद्घाटकीय भाषणात जनतेला भेडसावत असलेल्या समस्यांबाबत अवगत करतांना सांगितले की, मोठ्या प्रमाणावर वाढलेली महागाई व बेरोजगारी, सत्ताधारी पक्षातील लोकांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे, हवाई चप्पल वाल्यांना हवाई जहाजाचे सफर करण्याचे, विदेशातून काळा धन आणण्याचे व प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याचे, प्रत्येक बेघराला 2022 पर्यंत पक्क घर, घरात नळ व नळात जल देण्याचे, महागाई कमी करण्याचे, आतंकवाद संपविण्याचे व असे अनेक आश्वासने देऊन दिशाभूल करून एक गठ्ठा मतं घेऊन सत्तेत आल्यावर सर्व आश्वासने विसरून समाजात द्वेष पसरवून विभाजन करून आता मतं मागत आहेत, करिता जनतेने त्यांनी निवडून दिलेल्या आमदार खासदार या जनप्रतिनिधींनी त्यांच्या समस्या बाबत काय उपाययोजना केल्या, समस्यांबाबत संसदेत किंवा विधानसभेत प्रश्न उपस्थित केले का? याचा जाब त्यांना विचारा व सत सत विवेक बुद्धीचा वापर करूनच पुढच्या निवडणुकीत मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सह उद्घाटक माजी जि प सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष नागभीड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विनोदभाऊ नवघडे, उपाध्यक्ष जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष किशोर भाऊ भोयर, ब्रह्मपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नागेशजी बगमारे, संभाजी ब्रिगेड ब्रह्मपुरीचे मोंटूभाऊ पिलारे, मनसे ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष मंगेशभाऊ फटिंग, सरपंचा दीक्षाताई भजनकर, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.