ओबीसी भटके विमुक्त महाएल्गार मेळाव्याचे आयोजन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/सुनील शिंदे 

नांदेड – नरसी-नायगाव येथे येत्या ७ जानेवारी २०२४ रोजी आयोजीत केलेल्या ओबीसीचा महामेळाव्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती डॉ. बी. डी. चव्हाण यांनी पत्रपरिषदेत दिली. व नरसी येथील ग्राऊंड ची पाहणी करतांना जिल्ह्यातील ओबीसी व भटक्या विमुक्तसमाजाचे नेते सावता परिषद जिल्हाध्यक्ष गोरखनाथ राऊत यांच्या समवेत सर्व ओबीसी समाज बांधवाची उपस्थिती होती.या मेळाव्यात प्रकाश शेंडगे,विजय चौगुले, विनय कोरे,महादेव जानकर, इंद्रनिल नाईक, जयजगदीश क्षीरसागर,बबनराव तायवाडे, गोपीचंद पडळकर,चंद्रकांत बावनकुळे, लक्ष्मण गायकवाड, मच्छींद्र भोसले,विजय वड्डेटीवार आदी नेते उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.

Share This Article
error: Content is protected !!