ओबीसी महामेळावा पूर्वतयारी आढावा – उद्या नरसीत बैठक

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड प्रतिनिधी/सुनील शिंदे 

नांदेड – ओबीसी महामेळाव्याच्या पूर्वतयारीची बैठक शासकीय विश्रामगृह, नरसी येथे आयोजन करण्यात आलेले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, जातीनिहाय जनगणना आणि ओबीसीच्या सर्व महामंडळाना तात्काळ निधी देणे आदी मागण्यांसाठी नरसी येथे ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची पुर्व तयारी निमित्त बैठक उद्या दि १६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.तरी या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून ओबीसी जनमोर्चा चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉ. बी डी चव्हाण, अॅड. अविनाश भोसीकर आणि ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र देमगुंडे यांच्यासह सावता परिषद जिल्हाध्यक्ष गोरखनाथ राऊत,व जिल्ह्यातील सर्व समाजातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. तरी जिल्ह्यातील ओबीसी समाजातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी,नेत्यांनी, प्राध्यापक ,शिक्षक,कर्मचारी, व्यापारी,विद्यार्थी,शेतकरी आणि महिलांनी शासकीय विश्रामगृह, नरसी येथे दुपारी १२ वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!