लखमापूर जवळील भिषण अपघातात कारचालक जागीच ठार!

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक;घातपाताची शक्यता

आठवडाभरातील स्विफ्ट डिझायर अपघाताची दुसरी घटना

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी

माहूर – पहाटे चारच्या दरम्यान माहूर तालुक्यातील अंजनखेड जवळील राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर अज्ञात अवजड वाहनास ओव्हरटेक करताना झालेल्या भिषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच दि.१६ डिसेंबरच्या पहाटे पून्हा एका कार अपघाताची धक्कादायक घटना लखमापूर जवळील याच राष्ट्रीय महामार्गावर उघडकीस आली असून,कारचालक इसमाचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर

कारला धडक देणारे अज्ञात वाहन मात्र पसार झाले आहे.

विशेष म्हणजे आठवडाभराच्या आतच माहूर-सारखणी या राष्ट्रीय महामार्गावर भल्या पहाटेच्यापारी अपघाताच्या या घटनेतील दुर्दैवयोगाने अपघातग्रस्त वाहन हे स्विफ्ट डिझायर कार हे वाहन साम्य आहे.सदरील घटनेत मयताच्या कुटुंबाकडून माहूर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

किनवट तालुक्यातील बोधडी (बु.)येथील सुरेश लक्ष्मण केंद्रे वय ४५ वर्ष हे त्यांच्या बहिणीला नागपूर येथे सोडण्यासाठी गेले होते.बहिणीला नागपूर येथे सोडल्यानंतर ते दि.१५ डिसेंबर रोजी यवतमाळ मार्गे गावाकडे परत निघाल्यानंतर रात्री १० ते ११च्या दरम्यान माहूर ते सारखणी राष्ट्रीय महामार्गावरील तथा माहूर पासून जेमतेम पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या लखमापूर ते नखेगाव फाट्याच्या मध्यभागी त्यांच्या एम.एच.३१ ई.यू. ४४४६ या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने जात असताना पाठीमागून कोणत्या तरी अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याचे गाडीच्या प्रथमदर्शनी स्थितीवरून दिसून येत आहे.या धडकेत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असला तरी आज या मार्गाने आष्टा येथे महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांना त्यांचा मृतदेह अपघातग्रस्त कारच्या पाठीमागे झोपलेल्या (मृत) अवस्थेत आढळून आल्याने या प्रकरणी घातपाताच्या शक्यतेची जोरदार चर्चा घटनास्थळावर ऐकावयास मिळत होती. तर याठिकाणी दुस-या एका वाहनाचेही तुटलेले काही अवशेष घटनास्थळापासून काही फुटाच्या अंतरावर अस्तव्यस्त पडलेले दिसून येत असून ‘ते’ धडकलेले अथवा धडक मारलेले वाहन अज्ञातांनी रातोरात महामार्गाशेजारील नालीतून काढून नेल्यामुळे या घटनेचे गुढ अधिकच वाढले आहे.या प्रकरणी मृतकाच्या परिवारजनांकडून माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!