एस.टी. कर्मचाऱ्यांचा संताप उसळला नांदेडमध्ये ;सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटनेतर्फे अन्नत्याग आंदोलनास

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रति. हरजिंदर सिंघ संधू

नांदेड – दि.२४ जून पासून रा.प.म. (राज्य परिवहन महामंडळ) नांदेड विभागीय कार्यालयासमोर सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटनेतर्फे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात व त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठाम भूमिका घेतली आहे.

   कर्मचाऱ्यांनी अनेक समस्यांकडे लक्ष वेधले असून, त्यामध्ये विशेषतः एस.टी. बँकेच्या कपातीत झालेली जास्तीची रक्कम सभासदांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आहे. सध्या कपातीचा दर अनियमित असून, त्यात मनमानीपणा होत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही कपात नियमित हप्त्यानुसार केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

    तसेच, रा.प.म.च्या नियमानुसार इतर कामकाजासाठी चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांचा सेवाज्येष्ठतेनुसार वापर केला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, आठवड्याच्या सुट्टीचे रद्दीकरण झाल्यास त्याचा मोबदला मिळावा आणि अतिरिक्त कामकाजासाठी नियमानुसार भत्ता द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेने हेही स्पष्ट केले आहे की, विभागातील सर्व आगारांमध्ये रा.प.म.च्या नियमांनुसार रोटेशन प्रणाली लागू करून कामगिरी देण्यात यावी. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये पारदर्शकता आणि समानतेचा अनुभव येईल, असे संघटनेचे म्हणणे आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांचे इतर

   उद्भवणारे प्रश्नदेखील तात्काळ सोडवावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. प्रशासनाकडून या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन कर्मचारी हिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यात यावेत, अशी अपेक्षा आता कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आंदोलन शांततेत सुरु असून, पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही

Share This Article
error: Content is protected !!