नायगाव ता प्रतिनिधी :-
अतिशय गरीब व शेतमजूर असलेले श्री बालाजी गणपती वटपलवाड व सौ भारतबाई या मातापित्यांच्या पोटी गजाननचा दिं.15/06/ 1995 रोजी जन्म झाला.गजानन यांना लहाणपणापासूनच शिक्षणाची आवड, जिद्द आणि चिकाटी असलेल्याने परिस्थितीचे कधीच भांडवल केले नाही. उलट परिस्थितीच्या डोक्यावर पाय देऊन आज तो यशस्वी झाला आहे. आताच परिश्रम हे कधीच वाया जात नसते म्हणून गजानन पोलीस निरीक्षक पदी निवड झाली आहे. गजाननचे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण बरबडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले तर पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा येथे झाले. बारावी कला शाखेत सर्वप्रथम येण्याचा मानही गजानन ने पटकावला होता.
पुढे पदवी नंतर स्पर्धापरिक्षेसाठी काही दिवस पुणे येथे राहून तयारी केली. एक दोन अपयशाने खचून न जाता.जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची तयारी या गुणांच्या आधारे गजाननने अशिक्षित आई वडिलांचे स्वप्न आज साकार केले आहे.जिवनात यशस्वी होण्यासाठी धडपडणाऱ्या तरुण पिढी साठी तो एक दिपस्तंभ ठरला आहे.
त्याच्या यशाबद्दल त्यांचे आई-वडील, काका-काकू, आजी व सर्व नातेवाईक मित्र मंडळी पत्रकार बांधव ईत्यादी नी अभिनंदन केले आहे.गजानन हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री माधव वटपलवाड यांचा चुलत भाऊ आहे.