आदमपूरचे उपसरपंच प्रतिनिधी गोव्यात व गाव मात्र अंधारात

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील आदमपूर येथील उपसरपंच प्रतिनिधीचे पितळ मात्र पूर्णपणे उघडे पडणार आहे.ज्यांच्या ज्यांच्या आश्रयाने अडीच ते तीन वर्षापासून सत्ता उपभोगत आहेत. त्यांनाच साफ बेइमानी करत, आपल्या खराब प्रवृत्तीचे दर्शन गावासमोर दाखवत आहेत. आदमपूर या गावाची एक वेगळी परंपरा आहे.

आदमपूर गावातील एक चांगला आदर्श तालुक्यातील इतर गावे आजपर्यंत घेत आलेले आहेत. परंतु एक-दोन खराब नासक्या प्रवृत्तीच्या लोकांमुळे गावाला एक वेगळे वळण लागते की काय? याची भीती वाटत आहे.

आपली पत्नी उपसरपंच असताना,गावाच्या कारभारात हस्तक्षेप करत त्यांच्या पतीने एक हाती कारभार आजपर्यंत चालवला.एक हाती कारभार चालवणाऱ्या या व्यक्तीला दिवाळी सारख्या मोठ्या सणाच्या निमित्ताने गावामध्ये दिवाबत्ती लावण्याची सुबुद्धी ईश्वराने दिली नाही.

परंतु आज तो मात्र आदमपूर सारख्या मोठ्या गावाला अंधारात ठेवून गोवा,कोकण दर्शन करत महाराष्ट्रभर फिरत आहे. यांचा विचार सुद्धा आदमपूरवाशी यांनी केला पाहिजे. आपले मतदान घेऊन हे राजे होतात व प्रजेसोबत मात्र साफ बेइमानी करतात.अशा खराब प्रवृत्तीच्या लोकांना आदमपूर वाशियांनी वेळीच आवर घालावा जणतेतुन मागणी जोर धरत आहे.

 

एका विशिष्ट व्यक्तींना समोर करून ग्रामसभेमध्ये प्रश्न विचारणाऱ्यांना खोटे गुन्हे दाखल करण्याचे धमक्या देणे, गावातील लोकांचे तोंड बंद करून,आपली पोळी भाजून घेणे. हा त्या व्यक्तीचा आजपर्यंतचा धंदा आहे.

 

गावातील आजपर्यंतच्या कामांमध्ये खूप भ्रष्टाचार आहे असे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे. आपल्या हक्काचा पैसा जर एखादा व्यक्ती लाटत असेल तर,त्या गोष्टीची आदमपूर गावकऱ्यांनी विचार केला पाहिजे..

त्यासाठी गावातील सर्व युवा पिढीने एकत्रित येऊन याविषयी आवाज उठवल्यास गावातील अशा भ्रष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा बसेल

Share This Article
error: Content is protected !!