नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – वाघाळा शहर महानगरपालिके च्या निधीतून बांधण्यात आलेल्या शोभा नगर, स्वातंत्र्य सैनिक कॉलोनी नांदेड, येथिल अभ्यासिकेचे काम होऊन अनेक महिने लोटले आहेत मनपा प्रशासनाला याचा विसर पडला किंवा कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे.
याचे उत्तर प्रशासनाने द्यावे,सदर अभ्यासिका तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांची,नागरिकांची गैरसोय थांबवावी या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त यांना अतिरिक्त मनपा आयुक्त यांच्या मार्फत देण्यात आले सात दिवसात अभ्यासिका सुरू न केल्यास रिपब्लिकन सेने तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या प्रसंगी रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष नांदेड उ संदीप मांजरमकर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष साळवे,महासचिव शंकर थोरात,सचिव रविंद्र सोनकांबळे,शहराध्यक्ष विशालराज वाघमारे,ऑटो युनियन चे नरसिंग पुसा,बंटी कंधारे,अजय वाठोरे, संघर्ष गव्हाणे व इतर