नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यातील बिलोली तालुक्या मधील मौजे गंजगाव येथिल ग्रामसेवक प्रकाश वाघमारे गावात एक एक महिने येत नाहीत ग्रामसेवक हा गाव आणि सरपंच यामधील विकासात्मक दुवा समजला जातो. बिलोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गंजगाव ग्रामपंचायतीत ग्रामसेवक एक ना आनेक कारणे सांगुन लाभार्थाना परिशान करतात ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसून नायगाव ते बिलोली पंचायत समिती यांचा नेहमी अपडाऊन’ करतात. त्यामुळे गावविकासाला ‘खीळ’ बसत आहे गंजगावचे ग्रामविकास अधिकारी प्रकाश वाघमारे यांनी नेहमी ग्रामपंचायतीला दाडी मारतात त्यामुळे तुम्हीच सांगा ग्रामसेवक साहेब गावाचा विकास कसा साधणार?
जिल्हा परिषदेमार्फत राज्यशासनाच्या व केंद्रशासनाच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागात राबविल्या जातात.कल्याणकारी शासन म्हणून या सेवा ग्रामीण भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील, असे शासनाकडून पाहिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नियुक्त केल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे मात्र गावपातळीवर ग्रामसेवकांना गावाचा सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचा ग्रामविकास विभागाने धोरणात्मक निर्णय देखील घेतला आहे. मात्र, सदर निर्णयाची पायमल्ली होताना दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांचा असलेला दुर्लक्षपणा कारणीभूत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
गंजगाव ग्रामपंचायतला ग्रामविकास अधिकारी आसुन नसल्यासारखे आहेत गावात काय समस्या आहे हे पाहाणे ग्रामसेवकाचे कर्तव्य आसुन कर्तव्य शुन्य ग्रामसेवक मिळाले अशी चर्ची ग्रामस्था मध्ये चालु आहे ग्रामसेवक प्रकाश वाघमारे यांच्याकडे दोन ते तीन ग्रामपंचायतीचा कारभार असल्याने एक ना धड भाराभर चिंध्या अशी वास्तविकता आहे. ग्रामसेवक तर ठेकेदार देखील बनलेत.गावातील विकास कामे करीत असताना स्वतःच बांधकामाचे कंत्राट घेतात. मात्र, ते पडद्याआड आहेत.अनेक ग्रामपंचायतीचा कारभार असल्याने महामानवाच्या जयंती दिन अनुपस्थिती आसतात . बरेचदा ग्रामसभा आणि मासिक सभा 1 वाजता घेताता परंतु यांचा कोरम कसा पुर्ण होतो हे देखील संशोधनाचा विषय आहे.
ग्रामसेवक गावात हजर राहत नाही. गावातील कोणता वॉर्ड कुठे आहे? याची साधी माहिती देखील त्यांच्याकडे नसते. गावात कोणत्या समस्या आहेत, कोणती कामे करायची आहेत याची साधी कल्पना नसते कारण गावात कधी फिरकूनही पाहत नाहीत. गाव म्हटले की समस्यांचा जणू पाढाच असतो ग्रामपंचायतीमध्ये महिना महिना ग्रामसेवकांचे तोंड पाहिले नसल्याचे गावकरी सांगतात. त्यातच ग्रामसेवक नायगाव ते बिलोली पंचायत समिती ऐवठेच ‘अप डाऊन’ करीत असतात गावात पाण्याची सोय नाही.
विद्युत बल्प नाहीत घनकचारा व्यवस्थापन पंधरावा वित्त आयोग निधी चे कामे निकृष्ट दर्जाचे केले आहेत जलजिवन मिशन च्या नावाखाली गावातील सर्वच रस्ते फोडुन मोकळे झाले पावसाळ्याच्या दिवसात रस्तावरुन फिरणे अवघड झाले आहे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले पण तिथे पाणीच नसल्यामुळे शौचालय शोभेची वस्तु बनली आहे घनकचरा व्यवस्थापनासाठी सायकल खरेदी केली पण त्याचा वापर होताना दिसुन येत नाही आता तुम्हीच सांगा सरपंच व ग्रामसेवक साहेब गावाचा विकास कसा साधणार या कडे वरिष्ठाने लक्ष देवुन ग्रामसेवकाला आठवड्यातून दोन ते तिन वेळेस पाठवावे आशी ग्रामस्था मध्ये चर्चा आहे ….