मुदखेड/ राहुल कोलते
मुदखेड – उमेद अभियान अनेक माता मऊली मध्ये धाडस निर्माण करते. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करते. उमेद चळवळ महिलांना व्यवहारी बनविते. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील इजळी गावातील मीनाबाई व्यंकटी जाधव मुक्ताई महिला स्वयंसहाय्यता समूह हा गावरान तूप बनविण्याचा उद्योग करतो. त्यांना यावर्षीच्या नवी मुंबई येथील महालक्ष्मी सरस मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या गटाच्या महिलांनी सरस मध्ये विक्रीसाठी आणलेले गावरान तूप अत्युच्च दर्जाचे असल्याने तेव्हा मोठ्या प्रमाणात विक्री झाली. तेव्हाच चोखंदळ आणि दर्जेदार तुपाचे दर्दी असणारे काही ग्राहक आणि व्यावयिकांनी या गटाशी संपर्क ठेवला. अगदी आजही या ग्राहकांकडून या दर्जेदार तुपाची बऱ्यापैकी मागणी या गटाकडे होत आहे. या गटाच्या महिलांनी मागणी करणाऱ्यांची योग्य नोंद घेऊन थेट मुंबईत येऊन तुपाची विक्री सुरू केली आहे. कुणाच्याही मदतीशिवाय मागणी असलेल्या ठिकाणी या महिला उत्तम दर्जाचे आणि खात्रीलायक तूप पोहचवत आहेत. काल एकाच दिवसात रुपये १० हजारापेक्षा जास्त रकमेचे तूप या महिलांनी विकले आहे. राज्यभरातील अनेक महिलांना ही कथा प्रेरणादायी ठरेल. जिल्हा आणि तालुका अभियानाकडून मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले राज्य अभियान कक्षाचे श्री.धुमाळे सर,जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री.गजानन पातेवार सर , श्री.गणेश कवडेवार सर,श्री.द्वारकादास राठोड सर तालुका मुदखेड येथून तालुका अभियान व्यवस्थापक श्री. गणेश आरोटले सर, दिपाली धनेवार मॅडम,वैशाली कोतवाले मॅडम यांच्या मार्गदर्शना मुळेच मला हे शक्य झाले असे आमच्या प्रतिनिधी राहुल कोलते यांच्याशी बोलतांना सांगितले.