हिमायतनगर ता.प्रतिनीधी/जरगेवाड बाबाराव
हिमायतनगर – मौजे शिबदरा येथील जेष्ठ नागरिक तथा ह.भ.प.प्रकाश महाराज बाचकलवाड (पाटील) यांच आज रोजी अचानक निधन झाले आहे.
प्रकाश पाटील यांचे आज रोजी दुपारी 1वाजता निधन झाल्याची वार्ता पुर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली.
प्रकाश महाराज यांनी आपली कला व योग्य वक्तृत्व यांच्या जोरावर सांप्रदायात अनेक ठिकाणी आपला ठसा उमटविला होता.
प्रकाश महाराज यांच्या जाण्याने पुर्ण शिबदरा गाव शोक सागरात बुडाले आहे.ते आजात शत्रू म्हणून ही प्रसिद्ध होते.प्रकाश महाराज यांना दोन मुले दोन मुली नातू पंतू आसा मोठा परीवार आहे.
त्यांचा अंत्यविधी ऊद्या दिनांक 18रोजी त्यांच्या गावी शिबदरा येथे सकाळी 11वाजता होणार आहे.