नायगाव ता प्रतिनिधी :- मौ.वजीरगांव येथील अंशत: अनुदानित राजीव गांधी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतलेली व एका शेतकरी कुंटुंबातील मौ. टाकळी (त.ब.) येथील जिद्दी विद्यार्थीनी मीरा माधवराव मोरे हिने पोलिस निरीक्षक परिक्षेत उतिर्ण होऊन तिचे PSI होण्याचे स्वप्न साकारले असून तिने जिद्दी व चिकाटीने परिश्रम घेऊन एक मानाचा ठसा उमटविला या तिच्या यशा बदल परिसरातील व तालुक्यातील विद्यार्थीनीना एक प्रेरणा दिली आहे, या परिसरात वजीरगांव येथे माध्यमिक शाळा निर्माण करणारे माजी जि.प. अध्यक्ष- कै. रावसाहेब विठ्ठलराव मोरे पाटील यांनी या परिसरातील चांगले विद्यार्थी घडविण्यात मोलाचे सहकार्य लाभले
तिच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष व कुटुंर बाजार समितीचे उपसभापती मा.श्री मनोज रावसाहेब मोरे पाटील. टाकळी ( त.ब.) वजीरगाव ग्रामस्थ. शाळेच्या वतीने.नातेवाईक. इत्यादींनी अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
टाकळी (त.ब.) येथील मिरा मोरे यांची पोलिस निरीक्षक पदी निवड.. अंशत: अनुदानित शाळेतील विद्यार्थीनी PSI पदी निवड झाल्याचे कौतुक…..