नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड -असंघटित कामगार मेळावा”
नांदेड आयोजक सादिक मरखेलकर .
काँग्रेस पक्ष कार्यालय नांदेड येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड जिल्हा असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसच्या वतीने “असंघटित कामगार मेळावा” संपन्न झाला.
देशात आणि राज्यात सत्ता बदल झाल पाहिजे,कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत,काँग्रेस पक्ष कामगारांचे प्रश्न सोडवण्या करिता कष्टीबद्ध आहे असे म्हणत प्रदेशाध्यक्ष सुनील शिंदे यांची त्यांनी कौतुक केले.
सदरील मेळाव्याला असंघटित कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील शिंदे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ.मीनल पाटील खतगावकर यांची उपस्थिती होत्या
जिल्ह्यातील असंघटित कामगार लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध आहे आणि मीही आपल्या साठी सदैव कटिबद्ध राहीन अश्या भावना डॉ.मीनल पाटील खतगावकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी माजी आमदार अमरनाथ राजूरकर,जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष सादिक मरखेलकर ,
माजी सभापती किशोर स्वामी, सेवादलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोनकांबळे,रास्त भाव धान्य दुकान परवानाधारक संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक एडके, शाहुराज गायकवाड,पृथ्वीराज गच्चे,माली पाटील,रवी कांबळे,सौ.महानंदा गायकवाड,वनिता कांबळे,जनाबाई डूबुकवाड,रावसाहेब कांबळे, मंगलसिंग परमार यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य असंघटित कामगार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.