मराठा समाजाच्या आरक्षणविषयी संसदेत आवाज उठवण्यासाठी छत्रपती संभाजी राजेंनी महाराष्ट्रातील खासदारांची लावली बैठक…..

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नवी दिल्ली – मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी आयोजित सर्वपक्षीय बैठकीसंदर्भात संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “जसे राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे प्रयत्न करत आहेत. विधिमंडळात अनेक आमदारांनी आपली मत मांडली. खासदारांनी देखील मते व्यक्त करायला पाहिजे. संसदेत आवाज उठवण्यासाठी कशा पद्धतीने रणनिती आखता येईल, कशा पद्धतीने केंद्र सरकार मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. हे पटवून देण्यासाठी सर्व खासदारांचा रोल देखील तितकाच महत्वाचा आहे. त्यासाठी आज सर्वपक्षीय खादारांची बैठक बोलवली आहे.”

 

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “केंद्रात खासदारांची जबाबदारी आहे. लवकरच लोकसभेची टर्म संपणार असले तरीही सर्व खादारांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणासाठी आवाज उठवून प्रयत्न करू शकतात. त्यासाठी आज लोकसभा आणि राज्यसभेतील सर्वपक्षीय खासदारांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. प्रमुख खासदारांनी मी स्वत: फोन केले आहेत. या बैठकीसाठी माझ्या कार्यलयाकडून सर्व खासदारांना मेल आणि पत्र देखील पाठवण्यात आले आहे.”

 

मराठा आरक्षण या विषयी सर्व पक्षीय खासदारांचे आज बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. यासंदर्भात संजय राऊत म्हणाले, “संभाजीराजे छत्रपतींचा मला फोन आला होता. पण उद्धव ठाकरे येत असल्याने मला त्यांच्या स्वागत करण्यासाठी जायचे आहे. त्यांनी बोलावलेल्या बैठकी बाबत आमची सकारात्मकता आहे. जर मला वेळ काढता आला तर मी स्वतः किंवा शिवसेनेचा मोठा नेता उपस्थित राहील”.

Share This Article
error: Content is protected !!