लोकतंत्र न्युज संपादक/ अभिषेक बकेवाड
नांदेड – संत बालयोगी देवपुरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व श्री प.पु.महंत रामदेरेपूरी महाराज मठसंस्थान फुलडोंगरगाव श्री.प.पु.महंत जीवनदास महाराज मठसंस्थान चुडावा,श्री प.पू.महंत उत्तम महाराज तीर्थधानोरा ता.अहमदपूर श्री. प.पू.महंत निळकंठ महाराज कहाळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मठसंस्थान कहाळा खु.ता.नायगाव जि.नांदेड येथे बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 ते मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 पर्यंत अखंड दत्त नाम सप्ताह श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त महाप्रसाद व भजनी गीतांचा कार्यक्रम निमित्त आयोजित भजनी मंडळ उपस्थित मौजे कहाळा, पेठवडज, कवडगाव, लाठी खुर्द, बोरगाव, मरवाळी,आयोजन करण्यात आले आहे.तरी श्री.दत्तात्रेय प्रभू प्रगट सोहळा गुलाल 2 जानेवारी रोजी,दिनांक 3 जानेवारी रोजी, पहाटे पाच वाजता पालखी, मिरवणूक व काकड आरती होऊन सप्ताहाची सांगता होईल. कार्यक्रमाचा लाभ परिसरातील सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन समस्त भक्त मंडळी कहाळा खु,पेठवडज,कवडगाव येंडाळामहाठी,बाबुळगाव,लाठी खु,हातनी इत्यादी गावकरी भक्त मंडळी यांनी केले आहे.