गोगदरी ता.कंधार (06-07-2023)
कंधार तालुक्यातील गोगदरी या गावचे भूमिपुत्र विशाल कल्याणकर यांची नुकतीच एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून महाराष्ट्र राज्यातून 33 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक (PSI)या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांच्या मूळ गावी गोगदरी ता. कंधार येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने जल्लोषात मिरवणूक काढून जेसीबीने गुलाल उधळत उघड्या जीपमधून ढोल ताशाच्या गजरात डीजेसह न भूतो न भविष्यती अशी जंगी मिरवणूक काढण्यात आली व त्याच्या या यशाबद्दल समस्त गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
विशाल कल्याणकर हे गोगदरी ता. कंधार या गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातून शिक्षण घेऊन पोलीस उपनिरीक्षक(PSI) या पदावर नियुक्त होणारे पहिलेच व्यक्ती असल्यामुळे गावात त्यांच्या या निवडीबद्दल आनंदाचे व हर्षोल्लासाचे वातावरण पाहावयास मिळाले. या निवडीबद्दल डीजेच्या तालावर ठेका धरून गावकऱ्यांनी आनंद साजरा केला. कंधार शहरात मिरवणुकीने जाऊन छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विशाल याने अभिवादन केले.
विशालने आपल्या यशाचे श्रेय त्याचे मोठे काका सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय बाबानगर नांदेड या शाळेचे मुख्याध्यापक
श्री मारोतराव कल्याणकर तसेच वडील महात्मा फुले प्राथमिक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री व्यंकटराव कल्याणकर तसेच विशालला शिकवणारे व मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक व गुरुजन वर्ग यांना या यशाचे श्रेय दिले आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड गोगदरी ग्रामस्थांच्या वतीने विशाल कल्याणकर यांचा भव्य सत्कार…