नांदेड प्रतिनिधी /सुनील शिंदे
नांदेड – लोकसभा निवडणुकीच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या आहेत. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या व नगरपालिकेच्या निवडणुका आणखी दीड वर्ष होणार नसल्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे इच्छुकांची घोर निराशा झाली असून प्रशासक राजच कायम राहणार आहे. निवडणुका होतील तेव्हा होतील, पण ज्या त्या पक्षाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला अधिक मते पडतील यासाठी प्रयत्न करावा लागेल.