सत्यशोधक चित्रपटाची रविवारी नांदेडला बैठक

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/

नांदेड – सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते मा. सुनील शेळके हे रविवार दिनांक 24 डिसेंबर ला दुपारी 3 वाजता नांदेड येथील राजमुद्रा न्यूज लाईव्ह स्टुडिओ, दुसरा मजला, बजाज गॅलक्सी, कॅनॉल रोड, छत्रपती चौक येथे येत आहेत. तरी आपण विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते गण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हे चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 5 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे सुनील शेळके हे निर्माते आहेत. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, ओबीसी संघटना, एससी-एसटी संघटना, अधिकारी कर्मचारी संघटना, पुरोगामी व फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील विविध सामाजिक कार्यकर्ते व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार असून ‘सत्यशोधक’ चित्रपटाची माहिती या दरम्यान देणार आहेत.
तसेच सांयकाळी 5 वाजता पत्रकार बांधवांशी संवाद साधण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे. तरी आपण सहकारी मित्र परिवारासोबत मोठया संख्येने उपस्थित राहावे,असे
मा.गोरखनाथ राऊत (नांदेड)
जिल्हाध्यक्ष सावता परिषद
मा. राम वाडीभष्मे (नागपूर)
राज्य सरचिटणीस ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!