२८ रोजी भव्य शोभायात्रा मिरवणुकीच्या माध्यमातून रामभक्तांना अक्षत निमंत्रण
माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी
माहूर – नववर्षातील २२ जानेवारी रोजी श्री राम जन्मभुमी अयोध्या नगरीत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात प्रभु श्री रामललाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.त्यासाठी अयोध्या येथून देशभरातील रामभक्तांना या श्री रामलला मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पूजित अक्षताने भरलेल्या कलशातील अक्षत देऊन निमंत्रण दिले जात आहे.
सोबतच निमंत्रण पत्र देखील दिले जात आहे.त्यासाठी हे पूजित अक्षत कलश व निमंत्रण पत्र प्रत्येक ठिकाणी पाठविण्यात येत आहेत.आज २४ डिसेंबर रोजी अयोध्या येथून आलेले पूजित अक्षता असलेले कलश,निमंत्रण पत्र व प्रतिमा ह्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र माहूर येथे पोहचविण्यात आल्या आहेत.
भाजपा व बजरंगदल पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पवित्र अक्षता असलेल्या कलशाचे विधीवत पूजन करून हे कलश कपिलेश्वर मंदिरात ठेवण्यात आले असून,२८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता या पूजित कलशासह कपिलेश्वर मंदिरापासून शहरातील मुख्य मिरवणूक मार्गाने भव्य शोभा यात्रेच्या माध्यमातून रामभक्तांना घरोघरी हे अक्षता निमंत्रण देण्यात येणार असल्याचे भाजपा नगरसेवक सागर महामुने यांनी सांगितले आहे.
भारतातच नव्हे तर जगातील तमाम हिंदू धर्मीय नागरिकांच्या धार्मिक भावना प्राणप्रिय पुरुषोत्तम प्रभु श्री रामाशी जुळलेल्या असतांना,त्यांचे हे आराध्य दैवत तब्बल ५०० वर्षांपासून अयोध्येत मंदिराविना होते.आता ही प्रतिक्षा संपली असून,श्री राम जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे भव्य दिव्य राम मंदिर बांधून तयार होत आहे.नववर्षातील २२ जानेवारी रोजी या मंदिरात प्रभु श्री राम ललाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.त्यासाठी अयोध्या येथून देशभरातील रामभक्तांना या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पूजित अक्षता कलशातील अक्षता व निमंत्रण पत्र घरोघरी पाठविण्यात येत असून,आज २४ डिसेंबर रोजी निमंत्रण पत्रिका व अक्षता ह्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र माहूर येथेही प्राप्त झाल्यात.२८ डिसेंबर रोजी ह्या पूजित कलशातील अक्षता ह्या माहूर शहरातून भव्य शोभायात्रा मिरवणुकीच्या माध्यमातून रामभक्तांना घरोघरी पोहचविण्यात येणार असून,
तोपर्यंत हे पूजित कलश स्थानीक श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात सुरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल वाघमारे यांनी सांगितले आहे.
यावेळी अॅड.रमण जायभाये,अविनाश भोयर,संतोष तामखाने, विनायक मुसळे,हर्षदीप दिक्षीत,विजयराणा हजारी यांच्यासह योगेश परसवाळे,विक्की सुने, नितेश राठोड,गवळी काका, सौरभ भोपी यांची उपस्थिती होती. २८ रोजी अक्षता निमंत्रण वितरण शोभायात्रेत सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे तसेच तालुक्यातील रामभक्तांनी अयोध्या येथील श्री रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रभु श्री रामाचे दर्शनाचा लाभ घ्यावा !असे आवाहन नगरसेवक गोपू महामुने,ज्येष नेते अनिल वाघमारे ,अॅड.रमण जायभाये यांनी केले आहे.