अवैद्यरित्या गोवंश कत्तल करणाऱ्या लोकांविरूध्द इतवारा पोलिसांची धडक कारवाई

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड :दि.२५.इतवारा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील आणि सिडको ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैधरित्या बैलांची कत्तल करून त्यांचे मास विक्री करणाऱ्यास पोलिसांनी सकाळी पहाटे कारवाई केली सिडको ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत 09 बैल पकडण्यात आले तर इतवारा स्थानकाच्या हद्दीत 04 कारावया करण्यात आल्या अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली,

श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक,नांदेड यांनी मा उप विभागीय पोलीस अधिकारी इतवारा,सुशिलकुमार नायक यांना उपविभाग इतवारा,हद्दीत पोलीस स्टेशन इतवारा व नांदेड ग्रा.हदद्दीत गोवंशीय जातीचे बैल,यांची तस्करी व कत्तल करणा-या विरूध्द छापे टाकून कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने उप विभागीय पोलीस अधिकारी इतवारा सुशिलकुमार नायक यांनी उपविभाग इतवारा, अंतर्गत पोलीस स्टेशन इतवारा व नांदेड ग्रामीण पोलीस अधिकारी व अंमलदार,डी बी पथक,पो.स्टे.नांदेड ग्रामीणचे पोलीस अधिकारी, अंमलदार असे वेगवेगळे पथक तयार करून,दिनांक 24.12.2023 रोजी सकाळी 05.00 ते 10.00 वा पावेतो पो स्टे इतवारा व पो.स्टे.नांदेड ग्रामीण हयात ठिक ठिकाणी छापे मारून पो.स्टे. इतवारा नांदेड येथे एकुण 03 गुन्हे व पो,स्टे, नांदेड ग्रामीण अंतर्गत 01 गुन्हा असे एकूण 04 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत नमूद 4 गुन्हयात 13 आरोपी निष्पन्न झाले असुन त्यातील 7 आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्हयामध्ये एकुण 13 गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका करून गोशाळा येथे दाखल करण्यात आले आहे तसेच आरोपीतांकडून एक ट्रक,एक टाटा AES टेम्पों व गोवंश जातीचे मांस असा एकुण 22,00000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक, नांदेड,अविनाश कुमार अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शना खाली मा उप विभागीय पोलीस अधिकारी इतवारा,सुशिलकुमार नायक उपविभाग इतवारा यांचे नेतृत्वात पो.नि.संतोष तांबे,सपोनि श्री आनलदास,सपोनि श्रीधर जगताप,पोउपनि कोरे, पोउपानि गायकवाड, पोहेकों 802 वाजीद पोना 1809 मिलींद नरबाग,डी बी पथकाचे अंमलदार पोहेको 436 मोकले, पोहेकों 664 हाके,पोना 2543 चाऊस,पोना 2556 दासरवार, पोको 2800 कोरनुळे,पोकों 555 माने,पोर्को 493 गायकवाड,पोकों 471 देशमुख, पो स्टे नांदेड ग्रामीणचे पोहेका वाकडे,पोहेका मलदोडे,पोहेका मुंडे, पोकों स्वामी, जाधव, बेलुरोड,दासरे,कलंदर,सत्तार शेख असे अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली आहे सदर पथकाचे मा पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे

Share This Article
error: Content is protected !!