मानवी हक्क अभियान नांदेड चे कार्यकर्ते मच्छिन्द्र गवाले, दिगंबर गायकवाड, संघमित्रा गवले, संगीता वाघमारे यांनी समाजरत्न पुरस्कारांनी सन्मानित……

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/अशोक वाघमारे 

नांदेड – मानवी हक्क अभियानाचे नांदेड कार्यकर्ते मराठवाडा अध्यक्ष मच्छिंद्र काशिनाथ गवाले ,दिंगांबर गायकवाड ,संघमित्रा गवळे संगीता वाघमारे, कार्याची दखल घेऊन तेलंगणा राज्याच्या वतीने हैद्राबाद येथे त्यांना प्रशस्तीपत्र,सन्मानचिन्ह, रोख रक्कम देवून समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
सदर कार्यक्रम रविवारी दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी रविंद्र भारती एससी हाँल हैद्राबाद येथे जीसीएस वेलूरी फाउंडेशनच्या वतीने व्ही. आर. श्रीनिवास राजू, बी. सी. कमिशनचे चेअरमन श्रीओकला बरनम माजी मंत्री राजेशम गौड, महिला प्रतिनिधी व्हीना कुमारी, जेस्टिका मलकजगिरी मधुसुदनराव अनेक आमदार व खासदार,मानवी हक्क अभियान मचिंद्र गवाले मराठवाडा प्रमुख,दिगांबर विभुते,संगमित्र गवळे संगिता गरबडे,यांच्या उपस्थितीत दिगांबरराव पोचीराम गायकवाड यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला
त्यांनी मानवी हक्क अभियानाचे क्रांतीसुर्य एकनाथरावजी आव्हाड (जिजा) यांच्या नेतृत्वाखाली मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून जमिन अधिकार आंदोलन करून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा, अशा अनेक राज्यात जावून भूमिहीन लोकांचा लढा तिव्र करून लोकांना सरकारी जमिनी मिळवून दिले तसेच दलीत अत्याचार महिला अत्याचार बाल कामगार इत्यादी मानवी हक्कांचे प्रश्न घेऊन सरकार दरबारी लढवया कार्यकर्ता म्हणून काम केले त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केल्या बदल तेलंगणा राज्याचे महाराष्ट्रातून अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत

Share This Article
error: Content is protected !!