मुदखेड ता.प्रतिनीधी/
मुदखेड- येथील व्यकटेश नगर येथे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. प्रियंका प्रकाश सूर्यवंशी यांनी भारतरत्न, माजी पंतप्रधान *श्रेध्येय अटल बिहारीं वाजपेयी* यांच्या 99 व्या जयंती निमित्त सुशासन दिन म्हणून महिला मोर्चाच्या वतीने रांगोळी स्पर्धा घेऊन साजरी केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री प्रवीण अण्णा गायकवाड,ता.अध्यक्ष बालाजी पाटील खटिंग,पंचायत राज व ग्रामीण विकास आघाडी जिल्हाध्यक्ष मनोज कमठे,जेष्ठ नागरिक ग्यानोबा लोकरे पाटील, विठ्ठलराव सूर्यवंशी,शहर अध्यक्ष संजय उर्फ पप्पू सोनटक्के,युवा मोर्चा ता.महामंत्री ज्ञानेश्वर भांगे पाटील रामेश्वर लोकरे, माधव मांजरमकर, संतोष चिलवंतकर आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात शहर अध्यक्ष प्रियंका सूर्यवंशी, कौशल्याबाई दुधंबे, राधाबाई यरपलवाड, सविता बाई कवळे, अर्चना सूर्यवंशी, सुरेखा लोकरे, शिमा लोकरे, जनाबाई सोनटक्के, वर्षा लोकरे, मिना सूर्यवंशी, मंदा भांगे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सक्रिय सहभाग घेतला होता.
तर.
.सात ..विद्यार्थीणे सुरेख अस्या रांगोळी काढून *भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारीं वाजपेयी*
यांना जयंती निमित्त रांगोळीरुपी आदरांजली अर्पण केली.यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेचे गुणांकन करून निकाल जाहीर करण्यात
आला.
त्यात गुणांनुक्रमे
प्रथम..*श्रावणी सुर्यवंशी*..
द्वितीय..*सानिका पवार*..
तृतीय..*ईश्वरी हामंद*..
आली आहे.
असे कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश पाटील सूर्यवंशी यांनी केले आहे.