नांदेड प्रतिनिधी – सुनील शिंदे
नांदेड – धनगर समाजाच्या विवीध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शहरातील हनुमान मंदिर मंगल कार्यालय विजयनगर येथे दि.24 डिसेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीला जिल्हाभरातील मोठ्या संख्येने प्रमुख मान्यवर व कार्यकर्त्यांनी प्रतीसाद दिला. नांदेड शहरातील विसावा उद्यानात लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभे करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली असता नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना (शिंदे-गटाचे) आमदार बालाजी कल्याणकर यांनी माननीय मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन स्मारकाविषयीची माहिती दिली व निवेदनाद्वारे विनंती केली असल्याने आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्वत;या बैठकीत उपस्थीत राहून आपल्या भाषनातून बैठकीत अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी लागणारी जागा व नीधी शासन स्तरावरुन उपलब्द करुन देण्याचे आश्वासन दिले.या बैठकीस समाजाचे जेष्ट नेते ऍड.शिवाजीराव हाके,हरीभाऊ शेळके,संभाजीराव धुळगंडे,नागोराव शेंडगे बापू,प्रा.यशपाल भिंगे,बबनराव वाघमारे, बालाजी काळे,राजू गोरे, माणिकराव लोहगांवे एकनाथ धमने,गंगाप्रसाद काकडे,बालाजी हसनाळकर,महेंद्र देमगंडे, बालाजी पेटेकर,सखाराम तुप्पेकर,अवि कोकने,संतोष बारसे,पिराजी साखरे,वैभव खांडेकर, शशिकांत कोनापूरे,अविनाश कोकणे,नवनाथ काकडे,दिलीप मोकले,गोविंद गोरे,राज ,यांच्यासह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने ओबीसी व धनगर बांधव,मान्यवर नेते,कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.