एसटी प्रवाशांना कॅशलेस तिकीट कधी मिळणार? सध्या तरी नगदी पैसे घेऊनच दिली जाताहेत तिकिटे

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड –राज्य परिवहन महामंडळ चे अर्थिक कामकाज कॅशलेस म्हणजेच रोकड विरहित व्हावे म्हणूण सर्व उपमहाव्यवस्थापक,विभाग नियंत्रक यांना नविन अँड्रॉइड ईटीआय मशीन देण्याबरोबरच युपिआय पेमेंट प्रणाली कार्यनवित करण्यासाठीं वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक यांनी 7 डिसेंबर रोजी आदेशित केले आहेत पण त्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात मात्र उणिवा राहिल्या असल्याने प्रवाशांना सद्या तरी क्युआर कोड स्कॅनिंग किंवा कॅशलेस तिकीट तिकीट मिळत नाही आणि तिकीट नगदी पैसे देऊनच घ्यावे लागत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक यांनी परिवहन महामंडळात नविन अँड्रॉइड इटीआय मशीन सर्व आगारात कार्यनवित करण्या संदर्भात लेखी आदेश निर्गमित केले व त्याच्या अमलबजावणी करीता सूचना दिल्या पण अपेक्षित असणाऱ्या मशीन सर्व ठिकाणी पोहचल्या किंवा नाहीत आणि पोहचल्या असतील तर ग्रामीण भागात त्याचा वापर करताना कोणत्या अडचणी येत आहेत याची कारण मिमासा करण्याकरिता मात्र कोणालाही प्राधिकृत अधिकार दिले नाहीत त्यामळे हे अभियान कितपत यशस्वी ठरेल हे तर येणाऱ्या काळातच स्पष्ट कळेल.

प्रवाशांना कॅशलेस तिकीट मिळणे म्हणजे परिवहन महामंडळाच्या अधूनिकतेकडे पडणारे प्रगतीचे पाऊल म्हणून ही बाब अतिशय चांगली व सकारात्मक आहे पण ग्राउंडवर येणाऱ्या अडचणी आणि त्यातून निघणारे पर्याय यावर उपाययोजना बाबतीत मात्र सस्पेन्स कायम राखण्यात येत असल्याने माहिती व तंत्रज्ञनाच्या युगात ही उणीव का सोडली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रवाशांना कॅशलेस तिकीट मिळणे म्हणजे पारदर्शक कारभाराच्या दिशेने पडत असलेले राज्य परिवहन महामंडळाचे पाऊल कौतुकास्पद ठरेल पण हे अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ज्या साधन समुग्रीची व प्रशिक्षणाची उणीव भासत आहे ती तत्परतेने सोडवणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.
कयुआर कोड प्रणालीतून तिकीट मिळण्याची प्रक्रिया सर्वांसाठी उपयुक्त ठरेल तसेच विनातिकिट प्रवासास आळा बसेल फक्त हे अभियान केवळ कागदोपत्री आदेशात पडून राहू नये याची खबरदारी परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी घ्यावी लागेल.

*चौकट….*

एस टी महामंडळाचे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक यांनी हे अभियान सर्वच अगारात राबविण्यात यावे प्रवाशांना प्रवासाची तिकिटे कॅशलेस मिळावी यासाठी सर्व उप महाव्यवस्थापक ,आगार प्रमुख व तत्सम अधिकाऱ्यांना दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी सूचित केले आहे.

तसेच आँनलाईन ट्रानत्राझक्षन करताना तांत्रिक अडचणी मुळे जे पेमेंट व्यवहार फेल होतील त्या करीता तक्रार नोंद करण्यासाठी संपर्क क्रमांक देखील ऊपलब्ध करून दिला आहे.या नव्या सूचनेची तत्परतेने अमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

Share This Article
error: Content is protected !!