कंधार ता.प्रतिनिधी – प्रभाकर पांडे
कंधार – कौठा ता.कंधार येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आनंद सांप्रदाय संस्थान कवठा यांच्या भक्ती सोजन्याने दत्त मंदीर येथे दत्त जयंती महोत्सव सोहळा व अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन दि. २०/१२/२०२३ ते २६/१२/२०२३ पर्यंत श्री सदगुरु १०८ स्वामी गंभीरबन महंत महाराज कोलंबी यांच्या कृपेने व गुरुभक्त अमरपदवासी गोविंदराव संभाजी देशमुख यांच्या ज्वलंत गुरुभक्ती प्रेरणेने सप्ताह सुरुवात करण्यात आला होता सप्ताहात
सकाळी बाळक्रिडा पारायण दुपारी महापूजा, ग्रंथवाचन सांयकाळी प्रवचन व रात्री किर्तन व भजनाचा कार्यक्रम यशस्वी पार पडला
आज दत्त जन्मोत्सवपर द.भ.प.बालाजीराव देशमुख गुरुजी कौठेकर यांचे दत्त जन्मावर किर्तन व नंतर लगेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यास कौठा व परीसरातील भक्तांनी उपस्थिती लावली दत्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष लक्षण झटकवडे गोविंद बरगले बालाजी मुंडकर शिवाजी मुंडकर भुजंग मुंडकर बालाजी कंधारे भगवान पाटील शिरुरकर दत्ता पाटील जाकापुरकर बसवंतराव देशमुख प्रताप देशमुख चेअरमन सतिश देशमुख किरण देशमुख सह आदीनी सोहळा यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले व गावातील सर्व समाज बांधवानी सहकार्य करून सोहळा यशस्वी पार पडण्यासाठी मोलाचे योगदान दिले.