कंधार प्रतिनिधी/कैलास शेटवाड
कंधार – मौजे खंडगाव हमीनी तालुका कंधार येथे कै. ह.भ.प. गंगाधर महाराज आंबटपुरे यांच्या कृपा आशीर्वादाने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी दिनांक 2 जानेवारी 2024 पासून सप्ताह सोहळ्यास प्रारंभ होत असून सर्व आजूबाजूतील परिसरातील व गावातील सर्व भाविक भक्तांनी या सप्ताह सोहळ्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे तरी सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकडा आरती व सकाळी 6 ते 9 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तसेच सकाळी 10 ते दुपारी 12 गाथा भजन व दुपारी 2 ते 4 भावार्थ रामायण सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ रात्री 9 ते 11 हरिकीर्तन रात्री 12 ते 4 हरीजागर असे साप्ताहिक दैनंदिन नियोजन आहे तरी या सप्ताह सोहळ्यास ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ प्रमुख श्री हरिभक्त परायण नरसिंग महाराज लाळीकर व तसेच विनाप्रमुख श्री. बालाजी पा. मुगावे पेठवडजकर तसेच काकडा प्रमुख श्री.दत्ता मामा तेलवाड सौ. संजीवनी बाई पांचाळ पेठवडज श्री.गोविंद पाटील वडगावे श्री.उत्तम पांचाळ मादळीकर सौ. रमाबाई पांचाळ पेठवडकर यांचे सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमास उपस्थिती आहे.
तरी सप्ताहातील कीर्तनकार खालील प्रमाणे असतील…
दिनांक 2 जानेवारी 2024 रोज मंगळवार श्री.हरिभक्त परायण नरसिंग महाराज लाळीकर,दिनांक 3 जानेवारी 2024 रोज बुधवार सौ. हरिभक्त परायण कान्होपात्रा बाई बामणीकर व दिनांक 4 .1. 2024 रोज गुरुवार श्री.हरिभक्त परायण अरुण महाराज शिंदे (जवळ ढोकी) दिनांक 5, 1. 2024 रोज शुक्रवार सौ.हरिभक्त परायण मैनाबाई हिप्परळणारीकर व दिनांक 6.1. 2024 रोज शनिवार श्री.हरिभक्त परायण गुरुनाथ महाराज देगलूरकर व तसेच दिनांक 7.1. 2024 रोज रविवार श्री.हरिभक्त परायण निरंजन महाराज रुईकर,8.1.दि2024 रोज सोमवार श्री ह.भ. प. जगदीश महाराज डोंगरगाव (कर्नाटक) तसेच दि. 9.1.2024 रोज मंगळवार श्री. हर.भक्त प. नामदेव महाराज दापकेकर यांचे काल्याचे किर्तन सकाळी दहा ते बारा या वेळात होईल.तसेच अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने असा कीर्तन कार महाराज यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमास गायनाचार्य श्री.शिवाजी पाटील तांदळीकर व बालाजी पाटील मुगावे,दत्ता पांचाळ चांडोळकर, काशिनाथ महाराज बिल्लाळीकर, बालाजी महाराज ,आनंदा महाराज पोवळे होणार,माधव पाटील मादळीकर, निरंजन महाराज रुई, उत्तम वाघमारे,शिवाबाई मठपती मृदंगाचार्य श्री गजानन पांचाळ मुगाव, श्री संजय उमाटे गुरुजी मुखेड श्री विठ्ठल पाटील बेरळी (खुर्द) श्री. संजय पाटील पवळे गोणार,श्रीरंग पाटील मादाळी, भजनी मंडळ बोंमनाळी, कापरवाडी,खैरकावाडी,बेरळी (बु), मादळी, मसलगा,गोणार जाकापुर, पेठवडज,सिरसी या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास या सर्वांची प्राथमिक उपस्थिती असून श्री अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास दि. 2. 1.2024 पासून सुरुवात होत असून तरी सर्व भाविक भक्तांनी व आजूबाजूतील परिसरातील सर्व नागरिकांनी या सप्ताह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे समस्त गावकरी मंडळ खंडगाव (हे) तालुका कंधार जिल्हा नांदेड यांनी अहवान केले आहे…