राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत धर्माबादला सुवर्णपदक

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड- राज्य क्रीडा परिषद,क्रीडा व युवक प्राधिकरण,क्रीडा मंत्रालय भारत सरकार मान्यता प्राप्त भारतीय शालेय क्रीडा महासंघ द्वारा संचलित.24 वी राज्यस्तरीय शिकई मार्शल अजिंक्य स्पर्धा ही महाराष्ट्राचे राज्यअध्यक्ष श्री मजहर खान सर यांच्या मार्गदर्शनात दिनांक 23 व 24 डिसेंबर 2023 रोजी सोलापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

त्यात या राज्यस्तरीय स्पर्धेत धर्माबाद येथील हाफकीडो बॉक्सिंग कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून घवघवीत यश संपादन करत पुन्हा एकदा आपली चुणूक दाखवले आहेत.

यात घेण्यात आलेले खवनके एक या प्रकारात विद्यार्थ्यांनी आपले शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्कृष्ट पणे प्रात्यक्षिके सादर करून सुवर्णपदक मिळवत राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान श्रावणी इरवंत होटे,स्वाती गौतम मिसाळे,रागिणी काशिनाथ पांचाळ या विद्यार्थिनी मिळवला तर लोभा या प्रकारात कांस्यपदक मिळवत सृष्टी मारुती चपळे आणि कार्तिकी नागनाथ कात्रे या विद्यार्थिनीने पुन्हा एकदा धर्माबाद शहराचे नाव राज्य पातळीवर गाजवले आहे. त्यांच्यावर त्यांच्या शाळेतून व मित्र परिवारातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. त्यांना ड्रॅगन मार्शल आर्ट अकॅडमीचे ग्रँडमास्टर श्री दत्तात्रय सीतावार सर तसेच शिकई मार्शल आर्ट चे जिल्हाप्रमुख श्री चंद्रकांत आढाव सर आणि स्वयंसिध्दा महिला प्रशिक्षणाचे जिल्हा अध्यक्ष सौ रंजना आढाव मॅडम यांचे मौलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

Share This Article
error: Content is protected !!