माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी
माहूर – श्रीक्षेत्र माहूरगड येथे वर्षभरात भरणाऱ्या विविध लहानसहान यात्रोत्सवांव्यतिरिक्त डझनावारी प्रमुख मोठ्या यात्रांपैकी एक असलेला श्री दत्त जयंती यात्रोउत्सव दि.१९ ते २८ डिसेंबर दरम्यान लाखो भाविकांच्या सहभागातून मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.या यात्रोत्सव काळात येथील देवस्थान कडून भाविकांच्या भोजनाकरीता महाप्रसादाची व्यवस्था केली जाते.असे असले तरी शहरातील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने मागील चार वर्षांपासून भाविकांसाठी महाप्रसादरुपी कायम अन्नदान केले जात असून,यावर्षीच्या
दत्त जयंती यात्रोत्सव काळात सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
माहूरगड हे पौराणिक व ऐतिहासिक तिर्थक्षेत्र आहे.
शहरातील अनेक साधू सन्याशांची मठं व आश्रमांची संख्या लक्षणीय आहे.या आश्रमांमध्ये सात दिवस दत्त नामाचा गजरासह अन्नदान केले जाते.दत्तशिखर संस्थानतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते.तसेच शारदिय नवरात्र उत्सव काळात श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे भाविकांनसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते.असे असले तरी मागील चार वर्षांपासून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी भाविकांसाठी कायमच अन्नदान केले जात आहे.यावेळी दत्तजयंती उत्सवकाळात दर्शनासाठी आलेल्या एक लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असुन या पुण्यकर्मात अनेक भक्तदात्यांकडून विविध स्वरुपात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत असून,गडावर
जातांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली आहे.या अन्नछत्रात अनेक स्वामीभक्त सेवा बजावत असुन ज्या भक्तांना याठिकाणी सेवा करावयाची आहे अशांनी अन्नछत्र विश्वस्त समीतीशी संपर्क करावा, तसेच माहुर येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी आवर्जून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ अन्नछत्र समितीच्या वतीने करण्यात आले आहे.