उद्याला माहूर येथे अयोध्येहून आलेल्या अक्षता वितरण निमंत्रण भव्य कलशयात्रेचे आयोजन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी

माहूर – नववर्षातील २२ जानेवारी रोजी आयोजित प्रभू श्री रामलला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रामभक्तांना श्रीराम जन्मभूमी न्यास समिती अयोध्या येथून पाठविण्यात आलेल्या पूजित मंगल कलशातील अक्षता निमंत्रण वितरणासाठी “भव्य कलशयात्राचे” आयोजन शनिवार दि.३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पासून माहूर शहरातील श्री कपिलेश्वर मंदिर ते श्री राम मंदिरापर्यंत करण्यात आले आहे.यादरम्यान नागरिकांना घरोघरी अक्षता वाटून श्री रामलला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अक्षता व निमंत्रण पत्रक देण्यात येणार आहेत.या भव्य शोभायात्रेत

रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अक्षता कलशाचे दर्शन घ्यावे !असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 ही शोभा यात्रा हिंदू एकजुटीची अस्मिता आणि प्रभु श्री रामचंद्रांच्या संपलेल्या वनवासाचा धागा असणार असून,

प्रत्येक हिंदूनी या मंगलक्षणी शोभायात्रेत आपल्या प्रियजनांसह सहभागी होऊन आपल्या हिंदूत्वाची व हिंदू धर्मा ची शोभा वाढवावी तसेच या शोभायात्रेत सहभागी सर्व माता व भगिनींनी केशरी रंगाची साडी अथवा ड्रेस परिधान करावा आणि सर्व बंधूंनी पांढऱ्या रंगाचा शर्ट अथवा झब्बा घालावा अशी सूचनावजा विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!