श्री.दत्तात्रय यात्रा महोत्सवा निमित्त आष्टुर येथे भव्य जंगी कुस्त्या व कबड्डीचे खुले सामने

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

लोहा ता.प्रतिनिधी /

लोहा : तालुक्यातील प्रसिद्ध असलेले आष्टुर गावचे ग्राम दैवत नवसाला पावणारे श्री.क्षेत्र दत्तात्रय प्रभु यांची भव्य यात्रा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि. ३१डिसेंबर पासून सुरुवात होत असून कुस्तीचे उद्घाटक नांदेड लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा.खासदार श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तसेच कबड्डीचे उद्घाटक मा.एकनाथ दादा पवार (संस्थापक अध्यक्ष सूर्योदय मन्याड फाउंडेशन लोहा-कंधार) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये होणार आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.चंद्रसेन पाटील, मा.जि.प सदस्य नांदेड) मा.श्री.बालाजी गोविंदराव राठोड,(मा.पं.समिती सदस्य तथा सरपंच माळेगाव) मा.श्री.संजय नीलपत्रेवार साहेब, (स.पो.निरीक्षक माळाकोळी) मा.श्री.भीमाशंकर किशनराव कापसे (संस्थापक अध्यक्ष आझाद ग्रुप)इत्यादी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.रविवारी सकाळी 10 वाजता कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्रतील विविध भागातील कबड्डी संघ या मध्ये भाग घेत असतात.कुस्त्यांचा फड हे गेली अनेक वर्षांपासून या यात्रेचे मुख्य आकर्षण मानले जाते. या भागातील कुस्त्यांचा प्रमुख डाव या यात्रेनिमित्त येथे भरत असतो व विविध भागातील पहेलवान विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रतुन येथे येत असतात.सोमवार दि.१जानेवारी २०२४ रोजी पालकी सायंकाळी ८वाजता प.पु.महंत.श्री.विश्वनाथ बाबा कोटी यांच्या हस्ते पूजन करण्यात येईल. व पालकी सोहळ्याचे भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवार दि.२ जानेवारी रोजी जंगी कुस्त्यांचे सामने सकाळी १० वाजता सुरूवात होईल.यात्रेची तयारी गेली पंधरा दिवसापासून चालू आहे.व समस्त गावकरी मंडळी हे चांगल्या प्रकारे यात्रेच्या कामाचे नियोजन करत आहेत.अशी माहिती आष्टुर गावचे पोलीस पाटील संतोष शिंदे यांनी दिली.

Share This Article
error: Content is protected !!