जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे
नांदेड – उमरी शहरात काही भागांमध्ये नगरपंचायतच्या नळ पाईपलाईन द्वारे गटारीचे व दूषित पाणी येत असल्याची तक्रार एका निवेदनाद्वारे नगरपंचायत येथे करण्यात आली आहे. नगरपंचायत च्या ढोबळ कारभारामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्याचे बनले असून नागरिक वारंवार आजारी पडत असल्याचे देखील बाब पुढे येत आहे. नगरपंचायतीच्या नळ पाईपलाईन द्वारे मोठ्या प्रमाणात दूषित व गटारीचे पाणी सदर पाईपलाईन द्वारे येत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे. सदर पाईपलान हे वार्ड क्रमांक 9 मधील व्यंकटेश नगर उमरी येथील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी येत असल्याची तक्रार दिनांक 27 12 2023 रोजी संबंधित नगरपंचायत मुख्य अधिकारी साहेब यांना देण्यात आली आहे. नळाचे पाणी संबंधित भागामध्ये गटारीचे व दूषित पाणी येत असल्याने ते पाणी त्वरित बंद करून नागरिकांना शुद्ध जल पुरविण्यात यावे आणि येथील नागरिकाचा आरोग्याचा विचार करता नागरिकांना कुठलीच आरोग्य आणि होणार नाही याची खबरदारी घेऊन नगरपंचायत उमरी यांनी तात्काळ मध्ये शुद्ध पाणी व नळ नव्याने दुरुस्त करून नागरिकांना स्वच्छ व अशुद्ध पाणी देण्याची मागणी श्री विनोद मारुती लाडके वार्ड क्रमांक नऊ व्यंकटेश नगर उमरी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्य अधिकारी यांना तक्रार देण्यात आली आहे.