शापोआ संघटनेचे कंधार तालुका अधिवेशन संपन्न; नूतन कमिटीची एकमताने निवड 

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

८ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेवर शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून दुपारी १२:३० वाजता धडक मोर्चा,शालेय पोषण कामगारांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे!

नांदेड जिल्हा प्रतिनिधी /विजयसिंह हजारी
नांदेड : सीटू संलग्न महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे कंधार तालुका अधिवेशन ३१ डिसेंबर रोजी गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालय परिसरातील गट साधन केंद्रात दुपारी एक ते चार या वेळेत गंगाधर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कॉ.दत्ता शिंदे,कॉ.शिवाजी वारले आणि कॉ.मारोती केंद्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

आयोजन कमिटीचे प्रमुख तथा कंधार तालुका अध्यक्ष कॉ.माधव आंतापुरे यांनी वार्षिक आढावा अधिवेशनापुढे मांडला असता त्यावर चर्चा झाली. दि.८ जानेवारी रोजी शालेय पोषण आहार कामगारांच्या विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात येणार असून,ह्या मोर्चात कामगारांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन केले.

डिसेंबर महिन्यात संपूर्ण जिल्हाभर तालुकानिहाय अधिवेशने आणि मेळावे सुरु असून,नूतन तालुका कमिट्या निवडण्यात येत आहेत.नुकतीच ३१ डिसेंबर रोजी कंधार तालुका कमिटीची निवड करण्यात आली असून फेरअध्यक्षपदी कॉ.माधव अंतापुरे तर सचिवपदी कॉ.गजानन वडजे यांची एकमताने निवड झाली.उपाध्यक्ष पदी रामेश्वर सोनकांबळे व वनिताबाई साखरे,सहसचिव पदी विजयानंद वाघमारे व काशीबाई बयवाड तर कोषाध्यक्ष पदी नामदेव पवार यांची निवड करण्यात आली.जिल्हा कमिटीच्या वतीने नूतन कमिटीचे अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या.

सदरील अधिवेशनात कॉ.दत्ता शिंदे कॉ. शिवाजी वारले,कॉ.मारोती केंद्रे आदींनी मनोगत व्यक्त केले.
शालेय पोषण आहार कामगारांच्या अनुषंगाने राज्य सरकारने दि.१८ डिसेंबर रोजी नवीन शासन निर्णय जाहीर केला असून,शापोआ कामगारांना कामावरून कमी करण्या संदर्भातील शालेय शिक्षण समिती व मुख्याध्यापकांचे अधिकार कमी करण्यात आले असून ते गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना देण्यात आले आहेत.या शासन निर्णयाचे स्वागत संघटनेने केले आहे.
अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली किंवा जवळ आली की सरपंच व शालेय शिक्षण समितीचे लोक नाहक त्रास दित असल्याच्या अनेक तक्रारी सीटू संघटनेने मंत्रालयीन पातळीवर सातत्याने मांडून योग्य पाठपुरावा केल्यामुळे हे यश आले असल्याचे मत कॉ.
गायकवाड यांनी व्यक्त केले.

८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद नांदेड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर रेल्वे स्टेशन नांदेड येथून दुपारी १२: ३० वाजता धडक मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाचे नेतृत्व राज्य फेडरेशनचे सरचिटणीस कॉ.डॉ.अशोक थोरात आणि संघटनेचे अध्यक्ष कॉ.विजय गाभने हे करणार आहेत.अशी माहिती सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.

Share This Article
error: Content is protected !!