(नरसी चौकात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष )
जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे
नांदेड – महाराष्ट्र कर्नाटका या दोन राज्याला जोडल्या जाणाऱ्या नांदेड बिदर या रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्र शासनाने 750 कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल नरसी नरसी ता नायगाव येथील मुख्य चौकामध्ये श्रावण पाटील भिलवंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला .
आज मुंबई मंत्रालयामध्ये झालेल्या कॅबिनेटच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार यांनी नांदेड बिदर या रेल्वे महामार्गासाठी 750 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून या भागातील जनतेला नववर्षाची अनोखी भेट दिली .
याबद्दल नायगाव तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार व्यक्त केले आणि नांदेड बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे यासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खा . प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सततचा पाठपुरावा करून निधी खेचून आणल्याबद्दल त्यांचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर अभिनंदन केले .
यावेळी श्रावण पाटील भिलवंडे , शिवराज पाटील होटाळकर , बालाजी बच्चेवार , शंकर कल्याण ,मारोती पा भिलवंडे भगवानराव लंगडापुरे , धनराज शिरोळे , वसंत कस्तुरे , साईनाथ अक्कमवाड , व्यंकटराव कोकणे , गोविंद कुंटूरकर , रणजीत देशमुख , राजेंद्र होनराव , विनोद भिलवंडे , अलीमबेग पटेल , गजानन चव्हाण , हणमंत मिसे , जीवन चव्हाण , त्र्यंबक डाके यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .