माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी
माहूर – शासन आपल्या दारी’ या शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत (पीएम जनमन) माहूर तालुक्यात दि.०३ ते ०५ जानेवारी या कालावधीत कोलाम जमातीतील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देणे बाबत विशेष शिबीर राबविण्यात येत असून,माहूर तहसीलच्या पूरवठाविभागाकडून दि.०४ रोजी तालुक्यातील बोरवाडी (भिमपूर) येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबीरा अंतर्गत शिधापत्रीका वाटप,
मतदार ओळखपत्र वाटप,आधार कार्ड ,जातीचे प्रमाणपत्र वाटप आदी प्रकारचे लाभ लाभार्थ्यांना देण्यात आले.शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान अंतर्गत कोलाम जमातीतील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देणे बाबत दि.०४ जानेवारी रोजी माहूर तालुक्यातील बोरवाडी ( भिमपूर) येथे तहसील च्या पुरवठा विभागाकडून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरा मध्ये
नविन राशन कार्ड-०३ (अंत्योदय योजना),दुय्यम राशन कार्ड-०४, नाव समाविष्ट-१६,नाव कमी-०१, नावात दुरुस्ती-०१,भारत आयुष्यमान कार्ड-१५,(आधार अपडेट-०१, थंब प्रॉब्लेम-०१,)
आधार कार्ड अपडेट-२२,नवीन आधार कार्ड-०३, नवीन मतदान कार्ड नोंदणी-१७,जातीचे प्रमाणपत्र-१८ वंचित असलेल्या लाभार्थ्यांना नावे नोंद करून संचिका तयार करण्यासाठी सूचित करण्यात आले. बोरवाडी (भिमपूर) याठिकाणी कोलाम जमातीचे एकूण कुटुंब हे १७ आहेत.ज्यांची लोकसंख्या ४३ इतकी असून,त्यापैकी ३५ नागरीक उपस्थित होते तर ०८ नागरिक विविध कामानिमित्त गेल्याने गैरहजर होते.
उपस्थित ३५ लोकांपैकी १० जणांचे आभा कार्ड (आयुष्यमान भारत कार्ड)निघाले आहेत.तर ०७ जणांचे अपडेट करण्यासाठी पाठविण्यात आले. तसेच ०२ आधार कार्ड व ०१ आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले.
सदरील शिबीरासाठी माहूर तहसीलचे अव्वल कारकून एस.पी. जुकंटवार,म.अ.वानोळा जि. बी. कवडगावे, डी.व्ही.पेंटेवाड (तलाठी,कुपटी), डि. बी. पाईकराव – शिपाई,पवन बेहेरे-ऑपरेटर,जयवंत पवार रास्त भाव दुकानदार- बोरवाडी,सियाराम जयस्वाल -सेतू चालक,माहूर, पंडीत राठोड- सेतु चालक – वानोळा तांडा,उपसरपंच संजय मानकर,व गावातील सर्व कोलाम जमातीचे लाभार्थ्यांसह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.