बांधकाम विभाग धर्माबादचा गलथान कारभार
सामाजिक कार्यकर्ते चंद्रभीम हौजेकर यांनी दिला उपोषणाचा इशारा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड : जिल्यातील धर्माबाद शहरातील नटराज चौक ते बाळापूर कडे जाणारा मुख्य रस्ता बांधकाम विभाग धर्माबाद यांच्या हद्दीतील असल्यामुळे अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे तो रस्ता ना दुरुस्त केला जात आहे ना रस्ता नवीन टाकला जात आहे.
केवळ बांधकाम विभाग धर्माबाद यांनी त्यावर गीटी किंवा मुरूम टाकून तो रस्ता तसाच ठेवत आहेत खड्ड्याच्या ठिकाणी गिटी टाकल्याने अनेकांना याचा नाहक त्रास होत सहन करावा लागत आहे येथील बाळापूरला जाणारे अनेक प्रवासी अनेक नागरिक या बांधकाम विभाग धर्माबादच्या गलथान कारभाराला वैतागले आहेत तात्काळ दुरुस्त न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा बाळापूर येथील रहिवाशांनी दिलेला आहे.
बाळापुर ते नटराज चौक या मुख्य रस्त्यावर बांधकाम विभाग धर्माबाद यांनी मोठ मोठे गिटी पसार केलेली आहे.. यामुळे अनेकांना त्रास होतो आहे…टू व्हीलर पडते आहेत.अपघात होत आहेत.शाळकरी विद्यार्थ्यांना सायकल सुद्धा त्यावरून चालवता येत नाही …ये जा करणाऱ्या रोज हजारो प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक वेळा बांधकाम विभाग धर्माबाद यांना सांगून सुद्धा त्या ठिकाणी तो रस्ता दुरुस्त केला जात नाही ….
विनाकारण गीटी पसार करून अपघाताला आमंत्रण दिले जात आहे.हा सार्वजनिक बांधकाम विभाग धर्माबाद चा भोंगळ कारभार वारंवार सांगून सुद्धा दुरुस्त करणे तर दुरच परंतु त्या चालू असलेल्या रस्त्यात गीटी पसरवून अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे .
वेळेत बांधकाम विभागाने लक्ष न दिल्यास फार मोठा अपघात घडू शकतो आणि त्यात ये जा करणाऱ्या गाड्यांमुळे त्या पसरलेल्या गीटीमुळे धावत्या गाड्यांमुळे कोणाचा अपघात घडून आल्यास जीवितास धोका निर्माण झाल्यास यास सर्वस्व जबाबदार येथील सार्वजनिक बांधकाम विभागच राहील व तेथील संबंधित कर्मचारी राहतील याची त्यांनी जाणीव करून घ्यावी हेच आपणास सांगणे आहे.. होणारा त्रास लक्षात घेता ताबडतोब गीटी बाजूला सारून किंवा गीटीवर मुरूम किंवा डांबरीकरण करून तात्काळ तो रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी सर्व बाळापुर वासियांची मागणी होत आहे. जर नाही झाल्यास होत असलेल्या परिणामास जबाबदार मात्र संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग धर्माबाद चे संबंधित जबाबदार कर्मचारी राहतील हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने उपोषण आंदोलन करण्याचा इशारा बाळापूर येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रभिम हौजेकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नांदेड,उपजिल्हाधिकारी धर्माबाद,व सार्वजनिक बांधकाम विभाग धर्माबाद यांना निवेदनाद्वारे दिला आहे.