धर्माबाद बसस्थानकातील पाच वर्षापासूनशौचालय,मुतारी बंद;महिला व शाळकरी मुलींची कुचंबना

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील धर्माबाद येथील जुन्या बसस्थानक परिसरात पाच वर्षांपूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली साठ लाख रुपये खर्च करून दुसऱ्या मजलीचे बांधकाम केले,शौचालयही बांधण्यात आले पण त्या शौचालयाची कोणत्याच प्रकारची स्वछता नसल्यामुळे त्याचा उपयोग केला जात नाही.तब्बल पाच वर्षांपासून शौचालय व मुतारी बंद असल्याने विशेष महिला व शाळकरी मुला -मुलींची,व प्रवाशाची कुचंबना होत आहे.

धर्माबाद येथील नवीन बसस्थानक सन १९९२ मध्ये इमारत बांधकाम करण्यात आले.पंचविस वर्षांनंतर सन २०१८ मध्ये दुरुस्तीच्या नावाखाली साठ लाख व परिसरात डांबरीकरण साठी चाळीस लाख असे एकूण एक कोटी रुपये निधीचा खर्च करण्यात आला.तेही दुरुस्तीचे बांधकाम जुन्याच भिंतीवर भींती बांधुन,वर टिनशेड,त्या बाजुला कार्यालयीन साठी जुन्याच भिंतीवर स्लाप टाकुन इमारत उभा केली.शौचालय,मुतारी ही बांधकाम करण्यात आले. ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती ग्रह,उपहारगृह, शौचालय बांधण्यात आले परंतु कोरोनाच्या काळात ते बंद होते.

महामारी कोरोना ही जाऊन दोन वर्षे होत आली,शौचालय असुन नसल्यासारखे आहे.त्या अद्याप शौचालयचा वापर करण्यात आले नाही,पाच वर्षांपासून शौचालय बंद अवस्थेत आहे.शौचालय व मुतारी ग्रह चालू नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

बसस्थानकाच्या समोरच्या भागात मैदान असून पुरुष मंडळी इमारतीच्या मागच्या बाजूस जाऊन पुरुष मंडळीना इमारतीच्या मागच्या बाजूस जाऊन उघड्यावर लघुशंका करावी लागत आहे.या कारणाने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. महिला व शाळकरी मुलांची मात्र कुचंबना होत आहे. बस मध्ये जागा मिळत नाही म्हणून बस स्थानकाच्या बाहेर जाणे धोक्याचे आहे म्हणून प्रवासी त्रस्त आहेत.शौचालय उघडे करण्याची मागणी प्रवाशातून होत असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कुणीही कॉन्ट्रॅक्टर घेत नसल्याचे बोलले जात आहे.

एवढेच नसुन पिण्याचे पाणी नाही,प्रवाशांना विकत पाणी घ्यावे लागत आहे.

Share This Article
error: Content is protected !!