गेल्या 35 वर्षापासून नांदेडकरांच्या विश्वास असलेल्या श्रीराम रेफ्रिग्रेशन चे विस्तारीकरण.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – शहरातील येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे असलेल्या श्रीराम रेफ्रिजरेशन च्या भव्य अश्या अद्यावत युनिटचा विस्तारीकरण सोहळा आईस एज रेफ्रिजिनेशन अँड किचन इक्विपमेंट या नावाने तुप्पा, चंदासिंग कॉर्नर, हैदराबाद रोड ,नांदेड येथे आज, गुरूवार रोज,4 जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून आपल्या आगमनापर्यंत संपन्न होणार आहे..
नांदेड शहरात आपल्या उत्कृष्ट आणि दर्जेदार उत्पादनाच्या बळावर गेल्या अनेक वर्षापासून ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देत वॉटर कुलिंग या मोठ्या कंपन्याची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात श्रीराम रेफ्रिजेरेशन एक विश्वसनीय नाव म्हणून पुढे आले आहे आणि आता त्या वाटचालीत पुढे जातांना श्रीराम रेफ्रिजेरेशन ने दर्जेदार हॉटेल इक्विपमेंट ची शृखंला तयार करतांनाच अनेक नव व्यावसायिकांना कमी किमतीत उत्कृष्ट उत्पादन उपलब्ध करून देत मोलाची कामगिरी बजावली आहे ..
आपल्या उत्पादनात सातत्याने दर्जात्मक बदल घडवत नवनवीन तंत्रज्ञान वापरत एकापेक्षा एक सरस उत्पादने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याकडे श्रीराम रेफ्रिजेरेशन चा नेहमीच कल असतो त्या उदंड इच्छाशक्ती च्या बळावर आजरोजी नांदेड शहरातील थंड पाण्याचे संयत्र व त्या सोबतच लहान ते मोठ्या हॉटेलसाठी लागणारे इक्विपमेंट तसेच बेकरी साठी उपयोगात येणारी सयंत्रे तसेच साधनं बनविण्याचे एक विश्वसनीय उत्पादक म्हणून श्रीराम रेफ्रिजेरेशन चे नाव नांदेड करांना सुपरचित झाले आहे.
श्रीराम रेफ्रिजेरेशन आजमितीला विविध प्रकारचे वाटर कुलर,डीप फ्रिजर,बॉटल कुलर,व्हर्टीकल फ्रिज,मोठी शितगृहे,गॅस बर्नर,हॉटेल साठी उपयोगात येणारी विविध इक्विपमेंट ज्यात गॅस बर्नर,दोसा प्लेट,बॅनी मॅरी विथ सर्व्हिस काँऊटर,डम्प टेबल,वर्क टेबल,हँगिग सिंक, मसाला टेबल,स्टोरेज रॅक, सिंगल बर्नर शेगडी व अनेक प्रकारची उत्पादने याठिकाणी उत्पादित केली जातात..
*चौकट….*
साडे-तीन दशकांपूर्वी वडिलांने सुरू केलेल्या व्यवसायाला पुत्रांनी दिली आधुनिकतेची जोड व स्वंयरोजगारातून निर्माण केला आहे नांदेडकरांसमोर एक आदर्श !
एकविसाव्या शतकामध्ये शहरीकरण झपाट्याने वाढत गेले असले तरी त्यामुळे रोजगाराच्या संधीदेखील निर्माण झाल्या.ग्रामीण भागातील बेरोजगार युवक रोजगाराच्या शोधात महानगरामध्ये जाऊ लागले.
त्यांपैकीच एक युवक राजेंद्र तुकाराम आळंदीकर असेच ग्रामीण भागातून नांदेडला आले.सुरवातीला हाताला मिळेल ते काम सुरू केले;परंतु त्यांच्यातील उद्योजक मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.इकडची तिकडची कामे करून चार पैसे कमावत असल्यामुळे त्यांचा बऱ्यापैकी उदरनिर्वाह सुरू होता; परंतु काही तरी वेगळे करण्याची त्यांची धडपड असायची.त्यामुळे शेवटी त्यांनी १९८५ मध्ये नांदेड शहरात पाच बाय दहाच्या दुकानात फ्रीज दुरुस्तीच्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला.
अडचणीतून यशस्वी मार्गक्रमण करत वाटचाल…
सुरवातीला अडचणी आल्या; पण त्यांवर मात करीत त्यांनी मेहनतीने हा व्यवसाय सुरूच ठेवला आणि निरंतर प्रयत्नातून आज भव्य अशा विस्तारीकरणाकडे त्यांनी पाऊल टाकले आहे.