जामनेर ता. प्रतिनिधी /शिवाजी जाधव
जामनेर -दि ६ येथे जय गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थान तळेगाव/ शेळगाव तर्फे पायी दिंडी सोहळा संदर्भात नुकतीच बैठक संस्थानचे अध्यक्ष श्री. श्रावण कोळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .असून नियोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष – श्रावण कोळी, उपअध्यक्ष – डॉ. गजानन जाधव, सचिव – प्रमोदकुमार जैन दिंडी प्रमुख गजानन चौधरी, सदस्य- नितीनकुमार चोरडिया, आत्माराम कोळी ,लखिचंद गोरे डॉ.नरेश पालवे, शेषराव पवार भागवत जिरी, धनराज गायके, संजय सपकाळ, उपस्थित होते.पायी दिंडीचे हे १२ वे वर्ष असून ज्या भाविक भक्तांना पाय दिंडीमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपले नावे लवकरात लवकर संस्थानचे अध्यक्ष व सदस्यांकडे नोंदवावी. पायीदिंडी ही तळेगाव/ शेळगाव येथुन २९ जानेवारी २०२४ वार सोमवार रोजी सकाळी ठिक ६ः०० वाजता श्री बालाजी संस्थान श्रीराम मंदिर तळेगाव येथून प्रस्थान होत असून पायी दिंडी ही कासली, निमखेडी, फतेपुर, तोरनाळा देऊळगांव गुजरी येथे पहिला मुक्काम., ३० जानेवारीला धामणगाव बढे, स्थळ गजानन महाराज मंदिर , रोहिणखेड ,टाकळी बु. दुसरा मुक्काम, ३१ जानेवारी रोजी शिरवा,कोथळी, पिंपळगाव नाथ, भंडारी येथे गजानन महाराज मंदिरावर मुक्काम १ फेब्रुवारी रोजी उंबरा,निपाना, पिंपळगाव राजा, खामगाव मुक्काम २ फेब्रुवारी रोजी शेगांवला नगर प्रर्दशना नंतर पालखी सत्कार व भक्तनिवासला मुक्काम व ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता पालखी व दिंडीची सांगता करुन परतीचा प्रवास