किनवट येथे भाजपची नांदेड जिल्हा उत्तरची अभुतपूर्व जम्बो बैठक संपन्न

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी विजयसिंह हजारी
नांदेड – लक्ष्य हिंगोली लोकसभा निवडणुक-२०२४ डोळ्यांसमोर ठेवून हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली,
यवतमाळ व नांदेड या तीन जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघापैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या किनवट येथे भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर जिल्ह्याची कार्यकारणी बैठक दि.०७ जानेवारी रोजी पार पडली.
या बैठकीत हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी सुपर वॉरियर्स बाबत संघटनात्मक मार्गदर्शन करताना प्रत्येक बूथ वर ५१% मतदान मिळविण्याची लढाई जिंकण्यासाठी मतदार यादीचे विश्लेषण करण्याच्या सूचना केल्या.तसेच संघटनात्मक व तांत्रिक बाबींची अचूक माहिती देत हिंगोली लोकसभा क्षेत्रातील कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संपर्क साधण्याचे सुमठाकर यांनी आवाहन केले

येणाऱ्या लोकसभा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची नांदेड उत्तर जिल्हा कार्यकारणीची बैठक किनवट येथे झाली.या बैठकीत आगामी काळातील लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात संदर्भात महत्वपुर्ण चर्चा झाली.यावेळी काही संघटनात्मक नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.तसेच बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख तथा सुपर वारियर्स यांच्या कार्याचा आढावा जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी बैठकीदरम्यान घेतला.
यावेळी मार्गदर्शन करतांना हिंगोली लोकसभेचे समन्वयक गजानन घुगे यांनी भाजपाकडून पदाधिकाऱ्यांना ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या
अॅप्लिकेशनची सखोल माहिती दिली.
तर आ.राम पाटील रातोळीकर यांनी सांगितले कि,संघटनेत काम करताना कार्यकर्त्यांनी निष्फळ भावनेतून काम करत रहावे,एक ना एक दिवस निश्चितच न्याय मिळतो.असा विश्वास जतवला.
जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी आढावा घेतांना सांगितले कि,कार्यकर्त्यांनी निकोप चारित्र्यासह भविष्यातील ध्येय प्राप्तीसाठी आपला प्रपंच सांभाळत संघटनेचेही काम करावे.असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी प्रदेश सचिव व नांदेड लोकसभेचे समन्वयक देविदास राठोड,किनवट
विधानसभेचे संयोजक अशोक पाटील सूर्यवंशी,जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील, प्रवीण गायकवाड,गजानन
तुप्तेवार,लताताई फाळके, किनवट शहराध्यक्ष संतोष चनमनवार,माजी तालुकाध्यक्ष संदिप केंद्र,अशोक नेम्मानीवार, किशन मिरासे,महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संध्याताई राठोड,
युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप राठोड,अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास साबळे,
अर्चित नाईक किसान मोर्चाचे
सुधाकर कदम,डॉ.प्रसाद डोंगरगावकर,तेलगु भाषीक जिल्हाध्यक्ष मुकुंद नेम्मानीवार,
ओमकार पांडे, रामेश्वर पंड्या,
भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस बिभीषण पाळवदे, ज्योतीराम राठोड,दिनकर चाडावार,राघुमामा,सतिश
नेम्मानीवार,किनवट तालुकाध्यक्ष
बालाजी आलेवार, माहूर तालुका अध्यक्ष कांतराव घोडेकर,
हिमायतनगर तालुकाध्यक्ष गजानन चहर,हदगाव
तालुकाध्यक्ष तातेराव वाकोडे पाटील,भोकर तालुकाध्यक्ष गणेशराव कापसे,अर्धापूर तालुकाध्यक्ष डॉ.लक्ष्मणराव
इंगोले,मुदखेड तालुकाध्यक्ष
बालाजीराव खटिंग,सचिन कामारीकर,धीरज नेम्मानीवार, शिवाजी आंधळे,संतोष अडकिने, जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिक राठोड,आविनाश राठोड,
विश्वास कोल्हारीकर,संदिप पाटील वानखेडे,अपिल बेलखोडे, पुरुषोत्तम लांडगे,विजय टेळके, विष्णू दराडे,संतोष पेळे,चंद्रकांत नागमोड,प्रशांत पोपशेटवार, अक्षय पावडे,आशुतोष बेद्रे, विकास माहुरकर,शेख लतिफ, साई बाभुळकर,मारोती सूर्यवंशी, लक्ष्मण डांगे यांच्यासह हिंगोली,नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.किशन मिरासे यांनी केले.
आजपर्यंत भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अनेक बैठकींपैकी सदरील जम्बो बैठक ही आजवरची सर्वात मोठी,भव्य व भरगच्च अभूतपूर्व बैठक असल्याची कौतुहलपूर्ण चर्चा कार्यक्रमादरम्यान ऐकावयास मिळत होती.

Share This Article
error: Content is protected !!