[जवळपास २ हजार नागरिकांचा महिलांसह उत्स्फूर्त सहभाग.]
उमरखेड ता.प्रतिनिधी :मनोज राहुलवाड
“राम गावा राम घ्यावा, राम जीवीचा विसावा॥”
उमरखेड – जवळपास पाचशे वर्षांचा, रामाच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष आता फळाला आला असून, येत्या २२ जानेवारी रोजी संपूर्ण भारतवासीयांचं आराध्य दैवत प्रभू श्रीरामांचे भव्य दिव्य मंदिर, श्रीक्षेत्र आयोध्या येथे साकारत असून, या भव्य दिव्य मंदिराच्या लोकार्पणाच्या सोहळ्याचं, देशातील प्रत्येक घरोघरी अक्षता वाटप करून, प्रत्येक नागरिकाला आमंत्रण दिल्या जात आहे. यासाठीच श्रीराम मंगल अक्षता कलश ग्रामप्रदक्षिणा यात्रेचं, ढाणकी शहरात भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं होतं. हे आयोजन सकल हिंदू समाज ढाणकीच्या वतीने करण्यात आलं होतं. या भव्य दिव्य यात्रेत ढाणकी शहरातील तमाम हिंदू बांधव, युवा, बालगोपाळ व महिला जवळपास दोन हजार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ही शोभायात्रा श्रीराम मंदिर तोटेवाड कॉलनी इथून निघून, संपूर्ण गावातून मिरवणूक मार्ग क्रमण करीत समारोप श्रीराम मंदिर येथे करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व जनसमुदायाच्या चेहऱ्यावर रामा प्रतीचा भाव व मंदिराबद्दल चा एक विलक्षण आनंद दिसून येत होता.
याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता, बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.