माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी
माहूर – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वामी विवेकानंद यांची जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘नमो चषक क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव’ १२ जानेवारी पासून संपूर्ण देशभर आयोजित करण्यात येत असून,हिंगोली लोकसभा क्षेत्रातही त्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा केवळ महोत्सव नसून,हिंगोली लोकसभा क्षेत्रात भरणारा एकप्रकारे मिनी ऑलिंपिकचा मेळा असणार आहे.अशी माहिती भाजपाचे हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी नमो चषक आयोजनाबाबत त्यांना विचारले असता तरुणभारतशी बोलताना त्यांनी दिली.
आपल्या देशातील प्रतिभावान तरुणांना राष्ट्र उभारणीच्या कामी प्रेरित करण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा,क्रिडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा व यातून देशासाठी उत्कृष्ट युवा खेळाडू तयार व्हावेत.यासाठी शहरी व ग्रामीण भागातील तरुणांना मैदानी खेळाविषयी गोडी निर्माण व्हावी या मुख्य उद्देशाने स्वामी विवेकानंद यांची जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.१२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या
महोत्सवात १८ प्रकारचे विविध मैदानी खेळ आणि संस्कृतिक कला यांचा समावेश करण्यात आला आहे.स्वामी विवेकानंद यांची भाषणे,त्यांची शिकवण तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलेली आहेत.भाजप युवा मोर्चातर्फे हिंगोली लोकसभा क्षेत्रातील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद निहाय ”नमो चषक” क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन’ करण्यात आले आहे.त्यासाठी सर्वत्र जनजागृती करण्यात येत असून, प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे.हा महोत्सव १२ ते २६ जानेवारी या कालावधीत साजरा होणार असून,लोकसभा क्षेत्रातील विविध ठिकाणच्या मैदानावर हा नमो चषक पार पडणार आहे.याविषयावर हिंगोली येथे युवा मोर्चाच्यावतीने आयोजित नियोजन बैठकीतील माहिती तरुण भारतला देताना भाजपा हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि,‘‘भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशकडून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हा महोत्सव होणार आहे.इच्छुक लहान मुलांपासून मोठ्या खेळाडूंना १२ जानेवारी पर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.यासाठी हिंगोली लोकसभा क्षेत्रातील सर्व सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपा पदाधिकारी यांच्याकडे किंवा ऑनलाईन नावनोंदणी करावी लागणार आहे.
या नमो चषक महोत्सवामध्ये कुस्ती,फुटबॉल,व्हॉलीबॉल,
क्रिकेट,रस्सीखेच,कॅरम, बुद्धिबळ,कबड्डी,रणींग आदी मैदानी क्रीडा प्रकार घेण्यात येणार आहेत.यासाठी महिला व पुरुष असे दोन गट असणार आहेत.तर सांस्कृतिक प्रकारामध्ये चित्रकला,रांगोळी, गीत गायन,नृत्य,एकांकिका, वक्तृत्व आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.या स्पर्धा खुल्या गटात एकत्रित असणार आहेत. हा महोत्सव साजरा होत असताना जिल्ह्यातील भाजपाचे सर्व नेतेमंडळी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन होणार आहे.उद्घाटन व सांगता कार्यक्रमास राज्य स्तरावरील नेतेमंडळींसह युवा मोर्चाचे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगत या स्पर्धेत सहभाग नोंदणी “नमो ॲपवर ऑनलाईन उपलब्ध असून,
www.namochashak.in
या संकेत स्थळावर देखील इच्छुक खेळाडू आपला सहभाग नोंदवू शकतील.
अशी माहिती देत सुमठाणकर यांनी सांगितले कि,सदरील नियोजन बैठकीस
मा.आ.तान्हाजीराव मुटकुळे,
जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष पप्पू चव्हाण,विधानसभा संयोजक शिवाभाऊ मुटकुळे,युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी शिवाभाऊ घुगे,मंडळ अध्यक्ष माणिक लोढे, कैलास सेठ काबरा,हिम्मत राठोड,पक्षाचे पदाधिकारी,
महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.