ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा भव्य शुभारंभ संपन्न.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

एकाच छताखाली उपलब्ध असणार विविध प्रकारच्या अद्यायावत उपचार सुविधा उपलब्ध

मल्टीस्पेशलिटी । आय.सी.यू ऑर्थो गॅस्ट्रो कार्डियो। न्यूरो विभाग.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

 नांदेड : शहरातील येथिल अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील लोकमान्य टिळक मंगल कार्यालयाच्या पाठीमागे दत्तनगर येथे ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा भव्य शुभारंभ करण्यात आला, नव्या दमाचे तरुण तुर्क डॉक्टर असलेल्या आस्थि रोग तज्ञ डॉ. अवधुत रामराव मोरे (MBBS, D’ortho, DNB, MNAMS) , पोटविकार व लिव्हर तज्ञ डॉ. संदिप चाबुकस्वार पाटील (MBBS, DNB, DrNB Gastroenterology) तसेच मेडिसीन व अतिदक्षता तज्ञ डॉ. सुनिल मगर पाटील (MBBS, DA, MD), व मेंदू विकार तज्ञ डॉ. योगेश कुंटलवाड (MBBS, MD, DINB Neurology ) या स्पेशलिस्ट डॉक्टरांनी एकत्रित येत ओम मल्टी स्पेशलिटी या भव्य हॉस्पिटलची उभारणी केली आहे …

 

आज ७ जानेवारी रोजी रविवारी सकाळी साडेदहा वाजता मान्यवर उद्घाटक सौ. सुलोचनाबाई व दिगांबर रामजी माली पा.मोरे (आजी व आजोबा यांच्या शुभ हस्ते) तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरविंद केळकर प्राध्यापक व विभाग प्रमुख गॅस्ट्रोइंटरॉलॉजी अपोलो हॉस्पिटल,आसाम यांच्या प्रमुख उपस्थितीत उ्दघाटन सोहळा पार पडला.. यावेळी डॉक्टरांच्या टीम सह अनेक मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Share This Article
error: Content is protected !!