मुदखेड प्रतिनिधी/ राहुल कोलते
नांदेड – जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व कंधार – लोहा विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार प्रवीण पाटील चिखलीकर यांचे विश्वासू कार्यकर्ते व खंदे समर्थक ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर बालमुकूंद काळे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष ( ग्रा.) नांदेड दक्षिण पदी निवड करण्यात आल्याचे पत्र पाठवून कळविले आहे.
शिवशंकर काळे यांनी उस्माननगर सर्कल परिसरात व जिल्हाभर भारतीय जनता पार्टीचे कार्य जोमाने काम करत असतात. केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजनेचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून देतात. उस्माननगर सर्कल सह जिल्हाभर गोरगरिबांची सेवा केली. शिवशंकर काळे हे अनेक वर्षापासून उस्मानगर परिसरातील अनेक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमात स्वतःहून सहभागी होत असतात. त्यांना लहानपणापासून राजकारणाची आवड निर्माण झाली. राजकारण नेहमी सामाजिक बांधिलकीला धरून असते .ते कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निस्वार्थी भावनेने कार्य करत असतात. त्यांच्या कार्याची दखल भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.गजाननरावजी घुगे , भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव देविदास राठोड ,भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व कंधार ,लोहा विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार प्रवीण पाटील चिखलीकर व संतुकराव हाबर्डे ( भाजपा जिल्हाध्यक्ष द.) भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष हाणमंत बालाजीराव पाटील नरोटे यांनी शिवशंकर काळे यांना भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण नांदेड दक्षिण पदी नियुक्ती केली आहे.
शिवशंकर काळे हे उस्माननगर येथील जेष्ठ भाजपा कार्यकर्ते तुकाराम वारकड गुरुजी, भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष सुरेश मामा बास्टे, साईनाथ पाटील कपाळे, वैजनाथ पाटील घोरबांड, माधव भिसे ,संजय वारकड, यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरामध्ये काम करतात.
त्यांच्या निवडीबद्दल उस्माननगर शिराढोण परिसरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.