नांदेड बसस्थानकात प्रवाश्यासाठी गुरुद्वारा लंगर साहेबचे संत बाबा बलविंदर सिंघजी यांच्या शुभ हस्ते वाॅटर कुलर व पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड : जिल्हा प्रतिनिधी/

नांदेड:- विश्वासु प्रवासी संघटना नांदेड व महाराष्ट्र राज्य परिवहन नांदेड विभाग याच्या वतीने आज नांदेड बसस्थानकात पाणपोई व वाॅटर कुलरचे लोकार्पण गुरूद्वारा लंगर साहेबचे संत बाबा बलविंदर सिंघजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले
यावेळी प्रमुख उपस्थितीत विश्वासु प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर, आशिष मेश्राम आगार प्रमुख,साळूंके सर,यासीन खान बसस्थानक प्रमुख हे होते
या कार्यक्रमात उपस्थित संत बाबा बलविंदर सिंघजी यांचे शाल व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आले
बाबाजींनी नांदेड बसस्थानक व विश्वासु प्रवासी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले व सर्वांना आशीर्वाद दिले.
यानंतर विश्वासु प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकररावनांदेडकर, आशिष मेश्राम आगार प्रमुख,साळूंके सर, यासीन खान बसस्थानक प्रमुख यांना संत बाबा बलविंदर सिंघजी यांनी शाल देवून आशिर्वाद दिले.या कार्यक्रमास विश्वासु प्रवासी संघटने चे ङाॅ.हरदीप सिंघ,क्रृष्णा उमरीकर, राजकमल सिंघ गाडीवाले, मा.ना.झेंपलवाड , बालाजी पवार,रशिद पटेल, अमरजित सिंघ कालरा, इजिं.हरजिंदर सिंघ संधू महाराष्ट्र राज्य परिवहन नांदेड विभागाचे सतीश गुंजकर आगार लेखाकार,मुबिन शेख वाहतूक निरीक्षक,प्रवीण दामेरा वाहतूक नियंत्रक, माधव तोडे वरिष्ठ लिपिक, गोविंद सोनटक्के लिपिक,दिलबाग सिंघ गडगंज,गुरदीप सिंघ लिखारी उपस्थित होते.
या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी विश्वासु प्रवासी संघटनेचे कार्यालयीन प्रमुख इजिं.हरजिंदर सिंघ संधू , MSRTC चे आगार प्रमुख आशिष मेश्राम व साळुके सर, बसस्थानक प्रमुख यासीन खान , दिलबाग सिंघ, यांनी परिश्रम घेतले.

Share This Article
error: Content is protected !!